(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सावधान ! पावसाळ्यात बळावतील हे गंभीर आजार , वाचा सविस्तर
पावसाने सर्वच ठिकाणी थैमान घातले आहे. मात्र या ऋतूत मोठ्या प्रमाणात आजार बळावतात.
Monsoon Care Tips : देशातील काही भागात मान्सूनने (Mansoon) दणका दिला आहे. उष्णतेपासूनही दिलासा मिळू लागला आहे. पावसाळा हा खूप खास मानला जातो. या ऋतूत बरेच बदल होतात. काहींना भिजण्याचा आनंद घ्यायचा असतो तर काहींना या ऋतूत मजा करायची असते. मात्र, या ऋतूत रोगांचा प्रसारही झपाट्याने होतो. अतिवृष्टीमुळे शहरांसह अनेक भागात पाणी साचले आहे. दूषित पाणी साचल्याने जलजन्य आजारांचा धोका वाढतो. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरातील 80 टक्के आजार पाण्यामुळे होतात. अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात. अनेक दिवस साठवलेल्या पाण्यात बॅक्टेरिया आणि बुरशी निर्माण होतात, जे संसर्गाचे कारण बनतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी (Health Tips) घेतली नाही तर कोणते आजार बळावतील जाणून घेऊयात.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार (Health Tips)
कॉलरा
हा अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. कॉलरामुळे डिहायड्रेशन आणि डायरियाची समस्या असू शकते. हे टाळायचे असेल तर स्वच्छ पाणी आणि सकस अन्नच खा.
काविळ
दूषित पाण्यामुळे यकृतावर परिणाम होतो आणि काविळ होते. यात ताप, मळमळ यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच फक्त शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
टायफाॅईड
दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे टायफॉईड होऊ शकतो. हा पाण्यामुळे होणारा आजार आहे. पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजारही पसरतात.
अशा प्रकारे घ्या स्वता:ची काळजी
1. नळाचे पाणी कधीही पिऊ नये. त्यामुळे घाण पाणी पिण्याचा धोका आहे.
2. हातांची स्वच्छता आवश्यक आहे. त्यामुळे जेवण्यापूर्वी हात चांगले धुवावेत.
3. उघड्या विक्रेत्यांकडून भाजी विकत घेतल्यानंतर त्या नीट धुवून शिजवा. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी धुवून घेतल्यास अनेक आजार टाळता येतात.
4. तुम्ही जिथे राहता त्या परिसराचा भाग स्वच्छ आणि हिरवागार ठेवण्याचा प्रयत्न करा. घाण पाणी साचू देऊ नका. कारण घाणेरड्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरू शकते
5. पावसाळ्यात कीटक चावण्याची भीती असते, त्यामुळे शरीर पूर्णपणे झाकून ठेवा. मलेरिया आणि डेंग्यू टाळण्यासाठी मच्छर प्रतिबंधक वापरा.
6. जिथे पाणी साचले आहे, तेथून ते दूर करण्याचा प्रयत्न करा, कारण ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पावसात बाहेरून आल्यावर पाय धुवा.
इतर महत्वाच्या बातम्या
Tips to Heal Burnt Tongue : गरमागरम खाताना जीभ पोळली? मग करा 'हे' घरगुती उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )