Health Tips : बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी आजारांपासून राहा सावध
पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार बळावतात. अशा वेळी स्वता:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
Health Tips For Rainy Weather : "आला पावसाळा, आरोग्य सांभाळा". पावसाळा जेवढा अल्हाददायक वाटतो तितकाच विविध गंभीर आजारांना आमंत्रण देणाराही आहे. पावसाळ्यात अनेक आजार बळावतात. आजकाल हवामान खूप बदलत आहे. कधी ऊन, कधी पाऊस. अशा परिस्थितीत अनेक आजार आपले बळी ठरतात. म्हणूनच बदलत्या ऋतूत आपण थोडे सावध राहणे आवश्यक आहे जेणेकरून रोगाचा धोका नाही. आजकाल अनेक आजार लोकांना आपला बळी बनवत आहेत. या हंगामात रोगराई पसरण्याचा धोका जास्त असतो. या काळात जिवाणू, विषाणू, बुरशीमुळे होणाऱ्या आजारांचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात अनेकदा डास, पाणी, हवा आणि अन्न यांच्या मार्फत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ऋतूमध्ये शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात नेमके कोणते आजार होतात जाणून घेऊ.
पावसाळ्यात होणारे आजार
डासांमुळे होणारे रोग
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून शक्य तेवढे स्वत:चे रक्षण करायला हवे. जसे- मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया. हा काळ डासांच्या उत्पत्तीचा असतो. ज्यामध्ये डास अंडी घालतात आणि रोग पसरवतात.
दुषित पाणी आणि अन्नामुळे होणारे आजार
पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे आजार लगेच होतात. टायफॉइड आणि कॉलरा सारखे आजार होतात. कपडे धुताना, पाणी पिताना पाण्याची काळजी घ्या. या आजारांपासून सावध राहा. दूषित, अस्वच्छ पाण्यापासून दूर राहा.
संसर्गाचा धोका
कधी सूर्यप्रकाश तर कधी पाऊस, यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग लगेच होतात. बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे तापाची सहज लागण होते. अशा परिस्थितीत शक्यतो खूप गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
या बदलत्या ऋतूत संरक्षण कसे करावे
पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच जेव्हाही तुम्ही घरात किंवा बाहेर पाणी पिता तेव्हा काही खास गोष्टींची काळजी घ्या. कुलर आणि बागेत साठलेल्या पाण्याची विशेष काळजी घ्या. त्यामुळे त्यात डासांची पैदास होऊ शकते. संध्याकाळ होताच घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. घराबाहेर पडताना नेहमी छत्री सोबत ठेवा. गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर पाणी प्या. पाणी उकळल्यानंतरच प्या. घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रसत्न करा. स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. निरोगी राहा.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )