एक्स्प्लोर

Holi 2023: होळीचे रंग आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)

होळीच्या रंगांमध्ये पारा, सिलिका, शिसे, काच आणि किटकनाशके किंवा डिटर्जंट्स यांसारख्या घातक रसायनांचा समावेश असतो जी त्वचा, डोळे आणि अगदी फुफ्फुसासाठी विषारी ठरतात.

मुंबई : रंगांचा सण असलेल्या होळीमुळे केवळ त्वचेची किंवा डोळ्यांची अॅलर्जीच नाही तर श्वसनाच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. होळीच्या रंगांमध्ये धातू, काचेचे तुकडे, रसायने आणि कीटकनाशके असतात जी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) वाढवण्यास जबाबदार असतात. होळी खेळताना नैसर्गिक रंग वापरणे योग्य आहे. यावेळी कोणतेही डिटर्जंट किंवा रसायनयुक्त उत्पादने वापरू नका जी तुमची त्वचा आणि आरोग्यास घातक ठरेल.
 
होळीचे रंग अनेकदा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) ला कारणीभूत ठरतात. रंगांमध्ये पारा, सिलिका, शिसे, काच आणि किटकनाशके किंवा डिटर्जंट्स यांसारख्या घातक रसायनांचा समावेश असतो जी त्वचा, डोळे आणि अगदी फुफ्फुसासाठी विषारी ठरतात. हे रंग तोंडावाटे शरीरात प्रवेश करू शकतात आणि दमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखी परिस्थिती उद्भवू शकते. 

हा एक दाहक फुफ्फुसाचा रोग आहे ज्यामुळे फुफ्फुसातून हवेच्या प्रवाहात अडथळा येतो. त्याची लक्षणे म्हणजे श्वास घेण्यास असमर्थता, खोकला, श्लेष्मा (थुंकी) तयार होणे आणि छातीत घरघर होणे अशी प्रतिक्रिया डॉ चेतन जैन, पल्मोनोलॉजिस्ट, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्स यांनी व्यक्त केली. ते पुढे सांगतात की, तुम्हाला आधीच श्वासोच्छवासाची कोणतीही समस्या असल्याचे माहीत असल्यास रंगांपासून दूर राहणे योग्य राहिल. रंग लावताना सावधगिरी बाळगली पाहिजे. चेहऱ्यावर रंग लावणे शक्यतो टाळाच कारण असे करणे धोकादायक ठरु शकते आणि अनेकदा हा रंग तोंडात जाऊ शकतो. जर तुम्ही होळी खेळत असाल तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा जेणेकरून रंग सहज निघून जाईल.

होळीचे रंग तुमच्या फुफ्फुसावर दुष्परिणाम करू शकतात. अस्वस्थ करणारे श्वसन समस्या निर्माण करू शकतात. जर तुम्ही होळी खेळत असाल तर ती सुरक्षित पद्धतीने खेळा जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि रंग वापरण्यासाठी देखील सुरक्षित असतील. हे केमिकलयुक्त रंग सीओपीडी आणि इतर श्वसन समस्यांचा धोका वाढवतात. होळी खेळताना काळजी घ्या. प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनीही सावधगिरी बाळगून केवळ नैसर्गिक रंगांनी होळी खेळली पाहिजे. परंतु अनेकदा कोरड्या रंगांच्या इनहेलेशनमुळे देखील दमा/सीओपीडीची तीव्रता वाढू शकते. कलर इनहेलेशन टाळण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो असे डॉ अनिकेत मुळे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट यांनी स्पष्ट केले.

होळी हा सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे ज्यामध्ये लोक एकत्र येऊन तो साजरा करतात. होळीच्या रंगांच्या वापराशी संबंधित काही आरोग्य समस्या आहेत ज्यामुळे एखाद्याची आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. रंगांमुळे नाक वाहणे, शिंका येणे, नाक चोंदणे आणि न्यूमोनिटिस देखील होतो ज्यामुळे छातीत रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण आणि थकवा येतो. नैसर्गीक रंग वापरून होळी खेळतानाही सुरक्षितता बाळगणे योग्य राहिल. जर चुकून एखादा रंग तुमच्या तोंडावाट शरीरात गेल्यास तज्ञाचा सल्ला घ्या असेही डॉ. तन्वी भट्ट, पल्मोनोलॉजिस्ट,एसआरव्ही हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या

Holi 2023 Festival LIVE Updates: राज्यात होळीचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget