Health Tips : थंडीच्या मोसमात 'ही' चूक करु नका, नाहीतर वाढेल हदयविकाराचा धोका
Heart Attacks Increase in Winter : थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. थंडीमुळे ह्रदयविकाराच्या झटका येऊन देशात काही जणांचा मृत्यू झाला आहे.
Cardiologist Dr Manoj Kumar : देशभरात विशेषत: उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. यामुळे ह्रदयविकाराचा धोका (Heart Attack) वाढला आहे. थंडीमुळे (Winter) ह्रदयविकाराचा झटका येऊन देशात काही जणांचा मृत्यू झाला आहे. थंडीमुळे ह्रदयविकाराचा झटका आणि ब्रेनस्ट्रोकमुळे एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही फार चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ह्रदयासंबंधित आजार असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हृदयविकार असलेल्या लोकांनी कशी खबरदारी बाळगावी, हे जाणून घ्या.
थंडीच्या मोसमात 'ही' चूक करु नका
हृदयरोग तज्ज्ञाच्या मते, ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी सकाळी चालणे टाळावे. अशा लोकांनी त्यांच्या घरातच राहून व्यायाम करावा. थंड वातावणात पहाटे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडू नये. कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका अधिक
दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी विशेषत: वृद्धांनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक टाळावे, असे आवाहन केले आहे. डॉ.मनोज कुमार यांनी सांगितले की, वृद्ध व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, पण आजकाल तरुणांमध्येही हा धोका दिसून येतो. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी, कमकुवत हृदय असलेल्या, ह्रदयासंबंधिक आजार असणाऱ्या तसेच आजारी व्यक्तींनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक करणे टाळणे आवश्यक आहे.
'घरातच राहून व्यायाम करा'
ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, मद्यपान आणि धूम्रपानामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते, असा लोकांचा समज आहे, पण हे सत्य नाही. हिवाळ्यात शरीर उपबदार ठेवण्यासाठी व्यायाम हा योग्य पर्याय आहे. पण लोकांना थंड मोसमात पहाटे घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक किंवा व्यायाम करणे टाळावे. याऐवजी तुम्ही घरातच राहून व्यायाम करु शकता.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिल्लीसारख्या शहरात जिथे खूप प्रदूषण आहे, तिथे लोकांनी हिवाळ्यात कमीतकमी वेळ घराबाहेर पडावे. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता फार खराब आहे. तसेच येथे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Health News : काळजी घ्या, पंचविशीतील तरुणाईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )