एक्स्प्लोर

नंदूरबारमधील डुकरांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं, तर स्पेनमध्ये आढळला स्वाईन फ्लूचा रुग्ण; WHO कडून अलर्ट जारी

Symptoms of Swine Flu: नंदुरबारमध्ये डुकरांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आल्यानं खळबळ पसरली आहे. तर स्पेनमध्ये एका व्यक्तीमध्ये लक्षणं आढळल्यानं WHO नं अलर्ट जारी केला आहे.

Swine Flu: स्वाईन फ्लूनं (Symptoms of Swine Flu) पुन्हा एकदा जगासह महाराष्ट्राची (Maharashtra News) धडधड वाढवली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूची (African Swine Flu) लक्षणं आढळून आली आहेत. तर, स्पेनमध्ये (Spain) स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नंदुरबारमध्ये डुकरांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आल्यानं खळबळ पसरली आहे. गेल्या आठवड्यात शहादा तालुक्यातील म्हसावदमध्ये शंभरहुन अधिक डुकरांचा अचानक मृत्यू झाला होता. पशुसंवर्धन विभागानं भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत  तपासणीसाठी नमुने पाठवले होते. यामध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अहवाल येताच प्रशासनानं म्हसावद आणि लगतचे दहा किलोमीटर क्षेत्र केले प्रतिबंधीत घोषीत केलं आहे. या परिसरातील डुक्कांराची शास्त्रोक्त पद्धतीनं किलींग प्रक्रीया आजपासून सुरू केली जाणार आहे. या आजाराचा मानवी जीवनावर काही परिणाम होणार नसला तरी, याची लागन झालेल्या डुकांराचा मृत्युदर शंभर टक्के आहे. 

स्पेनमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद 

स्पेनमध्ये एका व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे.  29 जानेवारी 2024 रोजी स्पेनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी WHO अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. स्पेनमध्ये इन्फ्लूएंझा A (H1N1) व्हायरसच्या संसर्गाची तिसरी घटना आहे. स्पेनमध्ये पहिलं प्रकरण 2008 मध्ये नोंदवण्यात आलं होतं. तर दुसरं प्रकरण जानेवारी 2023 मध्ये नोंदवलं गेलं होतं. 

स्वाईन फ्लूबाबत WHO कडून अलर्ट जारी

डब्ल्यूएचओनं सांगितलं की, रुग्ण एक प्रौढ पुरुष आहे, जो लेइडा प्रांतातील डुक्कर फार्मवर काम करत होता. त्याच्यात लक्षणं आढळून आल्यानं त्याची चाचणी करण्यात आली. तपासणीत त्याला स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. डब्ल्यूएचओ म्हणतंय की, इन्फ्लूएंझा A (H1N1) व्हायरसच्या संसर्गाची बहुतेक प्रकरणं स्वाइन इन्फ्लूएंझा व्हायरसच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतात किंवा ते संक्रमित डुकरांच्या संपर्कात आल्यानं होतात.

स्वाईन फ्लू आणि इन्फ्लूएंझा ए (H1N1) म्हणजे काय?

स्वाईन फ्लू एक संसर्गजन्य श्वसन रोग आहे, जो सामान्यतः डुकरांना प्रभावित करतो. इन्फ्लुएंझा ए (H1N1) व्हायरस हे त्याचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जातं. स्वाईन फ्लू हा सामान्य लोकांमध्ये आढळत नाही, परंतु संक्रमित डुकरांच्या संपर्कात आलेल्या लोकांमधून पसरतो.

स्वाईन फ्लूची लक्षणं काय? 

  • ताप येणं, अंगदुखी
  • घशात खवखव आणि वेदना होणं 
  • सर्दी खोकला
  • डोकेदुखी
  • स्नायू दुखणं
  • डोळ्यांतून पाणी येणं
  • धाप लागणं 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

How to Cure Piles: पाईल्सचा त्रास औषधाविनाच ठीक होईल, पण कसा? जाणून घ्या सविस्तर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Numerology: प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Embed widget