(Source: Poll of Polls)
Health Tips : देशात वाढतायत दम्याचे रूग्ण; आजच 'या' सवयी बदला
Health Tips : वाढत्या प्रदूषणामुळे आणि जीवनशैलीमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Health Tips : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या राहणीमानात आणि खाण्याच्या सवयींमध्ये बरेच बदल झाले आहेत. तर, पर्यावरणाबदद्ल बोलायचे झाल्यास दिवसेंदिवस तेही प्रदूषित होत चालले आहे. त्याचप्रमाणे तंबाखू, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे तरूणांमध्ये दम्याचा (अस्थमा) त्रास वाढला आहे. भारतात आज सुमारे 20 दशलक्ष दम्याचे रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा दावा केला आहे की, जर वातावरण असेच प्रदूषित राहिले तर अस्थमा हा एकेकाळी सर्वात प्राणघातक आजार होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाचे दूषित होण्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. याशिवाय तरुणांनीही आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया तरुणांमध्ये कोणत्या सवयींमुळे दम्याचे रुग्ण वाढत आहेत?
या सवयींमुळे दम्याच्या रुग्णांची संख्या वाढतेय
- जे लोक सतत कामात व्यस्त असतात त्यांना दम्याचा त्रास जास्त होतो. अशा परिस्थितीत कामासोबतच शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला सिगारेटचे व्यसन असेल तर आजच ही सवय सोडा. कारण ही सवय पुढे दम्याचं कारण ठरू शकते.
- रोज किमान 500 मीटर चाालण्याची सवय ठेवा. यामुळे दम्याचा त्रास होणार नाही.
- बाहेरच्या गोष्टी जास्त खाऊ नका. त्यामुळे दम्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
- दररोज योगाभ्यास आवश्यक आहे.
- निरोगी आहार निवडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : स्मरणशक्ती वाढविण्यासाठी 'या' 5 सूपरफूड्सचा आहारात समावेश करा; जाणून घ्या सविस्तर
- Diabetes Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या मधुमेहींसाठी मान्सून फिटनेस टिप्स
- Weight Loss : सात दिवस 'हा' डाएट प्लॅन फॉलो करा अन् वजन घटवा; जाणून घ्या दिवसभराचा डाएट चार्ट
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )