Health Tips : पायात सतत जळजळ आणि खाज येतेय? 'या' घरगुती उपायांचा वापर करा
Health Tips : उन्हाळ्यात पायांच्या तळव्यामध्ये जळजळ आणि खाज येण्याची समस्या खूप वाढते. या घरगुती उपायांनी तुम्ही तळव्यांची जळजळ आणि खाज दूर करू शकता.
Health Tips : उन्हाळ्यात अनेकांच्या पायात जळजळ आणि खाज येण्याची समस्या खूप वाढते. तळव्यांमध्ये जळजळ झाली की ती सहन होत नाही. कामात लक्ष लागत नाही. उन्हाळ्यात पाय कोरडे पडल्याने हा त्रासही होऊ लागतो. त्याच वेळी, काही लोकांच्या शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन बीची कमतरता किंवा मधुमेहामुळे पाय जळू लागतात.
वैद्यकीय भाषेत याला बर्निंग फीट सिंड्रोम (Burning Feet Syndrome) म्हणतात. उन्हाळ्यात हा त्रास टाळण्यासाठी पाय मऊ ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पायांच्या जळजळीत आराम मिळेल. याशिवाय, पाय आणि तळव्यांची खाज आणि जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय देखील करू शकता.
मीठाचे पाणी - जर तुम्हाला तळव्यांना जळजळ किंवा खाज येत असेल तर यासाठी खूप जुनी पद्धत आहे. तुम्ही बादलीत पाणी भरून त्यात मिठाचे खडे मिसळा. त्यानंतर बादलीत थोडा वेळ पाय टाकून बसा. पाणी कोमट असेल तर लवकर आराम मिळतो. असे केल्यास पायाची खाज कमी होईल.
हळद - हळद खूप फायदेशीर आहे. जेवणात वापरली जाणारी हळदही तुमच्या पायांसाठी फायदेशीर आहे. पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो. त्यात प्रतिजैविक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे संसर्ग कमी करतात.
भरपूर पाणी प्या - उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नियमित 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते. अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवीसोबत बाहेर पडतात आणि त्यामुळे पायांची जळजळ होण्यास आराम मिळतो.
कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर - तळव्यांना जळजळ होत असेल तर तुम्ही आयुर्वेदिक उपचार करू शकता. यासाठी तुम्हाला कोरफडीचे जेल, खोबरेल तेल आणि देशी कापूर मिसळावे लागेल. आता हे मिश्रण पायांच्या तळव्यावर हलकेच लावा. ते लावताच पायात थंडावा जाणवेल. यामुळे पायांची जळजळ आणि खाज शांत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Diabetes Control : शुगर कंट्रोलही करायचाय आणि गोडही टाळता येत नाहीये? तर, 'हे' 5 उपाय फॉलो करा
- Cloves Benefits : वजन कमी करण्यासाठी लवंग आहे फायदेशीर; कसे ते जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )