Artificial Food Color : 'स्लो पॉयजन' आहे फूड कलर, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका
Artificial Food Color : आर्टिफिशिअल फूड कलरला (Food Color) फूड डाय (Food Dye) असेही म्हणतात. हे खाण्यायोग्य प्रक्रिया केलेले रंग असतात ज्यामुळे अन्नाचा रंग आणि चव सुधारते.
Artificial Food Color Side Effects : सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपले आरोग्याकडे फार दुर्लक्ष होताना दिसत आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये मोठा बदल झाला आहे. अपुरा वेळ आणि कधी कधी आळस यामुळे आपण घरगुती अन्नपदार्थांपेक्षा प्रोसेस्ड फूड (Processed Foods) किंवा बाहेरील अन्नपदार्थांची निवड करतो. पण याचा आपल्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होत आहे, हे तुम्हाला माहित आहे का? बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये अन्नातील कृत्रिम रंग म्हणजे आर्टिफिशिअल फूड कलर (Artificial Food Color) चा वापर प्रामुख्याने केला जातो. याचा वापर खाद्यपदार्थांचा रंग आणि चव सुधारण्यासाठी केला जातो. पण यामुळे तुम्हाला कर्करोग आणि त्यासारख्या गंभीर रोगांचा धोका असतो. याबाबत सविस्तर माहिती वाचा.
आर्टिफिशिअल फूड कलर आरोग्यासाठी हानिकारक
खाद्यपदार्थांचा रंग आणि चव सुधारण्यासाठी कृत्रिम खाद्य रंगाचा म्हणजे आर्टिफिशिअल फूड कलर वापर केला जातो. पण काही रिपोर्ट्सनुसार, याच्या अतिसेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका असतो. कृत्रिम फूड कलरचे तोटे जाणून घ्या...
'स्लो पॉयजन' आहे आर्टिफिशिअल फूड कलर
कृत्रिम खाद्य रंगापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये बेंझिन आढळते. याला कार्सिनोजेन असेही म्हणतात. याशिवाय आर्टिफिशिअल फूड कलरमध्ये अनेक रसायने आहेत, जी अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. अहवालानुसार, आर्टिफिशिअल फूड कलरने बनवलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
अटेंशन डेफिसिट हाइपरॲक्टिविटी डिसऑर्डर (ADHD - Attention Deficit Hyperactivity Disorder)
फूड कलरपासून बनवलेल्या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्याने अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डरचा त्रास होण्याचाही धोका असतो. म्हणजे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते किंवा अधिक ऊर्जा खर्च होणारी कामे करण्यात अडथळा येतो. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बहुतेक संशोधनांच्या अहवालानुसार, फूड कलरपासून बनवलेल्या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्याने एडीएचडीचा धोका वाढतो.
ॲलर्जीची समस्या
कृत्रिम फूड कलरमुळे ॲलर्जीची समस्या उद्भवू शकते. यापूर्वी अशी अनेक प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे. अनेक संशोधनानुसार, टारट्राझिन नावाचा पिवळा रंग दमा आणि पित्ताच्या समस्यांना चालना देऊ शकतो.
फूड कलर
कृत्रिम फूड कलरचा वापर झपाट्याने वाढला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीही फूड कलरचा वापर केला जात आहे.
फूड कलरचे सेवन कसे टाळाल?
घरी शिजवलेले अन्न खा
फूड कलरचे सेवन टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या अधिक प्रमाणात घरगुती अन्नपदार्थ खा. पॅकबंद अन्नापासून शक्यतो दूर राहा.
सकस आहार निवडा
खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे रंग वापरले जातात. त्यामुळे खाद्यपदार्थांची निवड करताना त्यात अन्न रंग मिसळण्याची शक्यता असते हे लक्षात ठेवा. त्यानुसार, योग्य आहार निवडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )