Health Tips : उच्च कॉलेस्ट्रॉलची लक्षणं त्वचेवरही दिसतात; 'या' पद्धतीने ओळखा
Cholesterol Symptoms : मानवी शरीरात कॉलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक चांगला आणि दुसरा वाईट. मात्र, या दोन्ही प्रकारच्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे फार गरजेचे आहे.

Cholesterol Symptoms : शरीर निरोगी तर आयुष्य निरोगी असं म्हटलं जातं. शरीरात जर कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) प्रमाण वाढले तर हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणूनच वेळेत कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मानवी शरीरात कॉलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक चांगला आणि दुसरा वाईट. मात्र, या दोन्ही प्रकारच्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे फार गरजेचे आहे. आपल्याला कॉलेस्ट्रॉल झाला आहे की नाही यासाठी त्याच्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही सुद्धा कॉलेस्ट्रॉलचा सामना करत असाल तर तुम्हाला त्याची लक्षणे तुमच्या त्वचेवर दिसू शकतात. उच्च कॉलेस्ट्रॉलवर वेळेत उपचार करणे फार महत्वाचे आहे. पण, नेमकी कॉलेस्ट्रॉलची ही लक्षणं कोणती आहेत? आणि ती ओळखायची कशी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरात ही लक्षणे दिसू लागतात :
1. त्वचेवर खुणा दिसतात : तुमच्या शरीरात जर कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. तुमच्या त्वचेवर साधारण खुणा दिसू लागतात. जर तुमच्या त्वचेवर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे डाग दिसले तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी फार वाढली आहे.
2. डोळ्यांवर पिवळे डाग : जर डोळ्यांच्या त्वचेवर पिवळे पुरळ दिसले तर ही लक्षणे कोलेस्टेरॉलकडे निर्देश करू शकतात. ही लक्षणे मधुमेहामध्ये देखील दिसू शकतात.
3. हात आणि पायांत वेदना जाणवणे : जेव्हा रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा हात आणि पायांवर देखील त्याचा परिणाम होतो. यामध्ये हात आणि पायांच्या त्वचेवर तुम्हाला मुंग्या येतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
4. त्वचेवर सूज येणे : शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यावर त्वचेवर जळजळ होऊ लागते. या समस्येपासून दूर व्हायचे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : शरीरात वारंवार वेदना होतायत? 'ही' आजाराची लक्षणं असू शकतात
- Diabetes Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या मधुमेहींसाठी मान्सून फिटनेस टिप्स
- Health Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर! जाणून घ्या खाण्याची पद्धत
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
