आरोग्यासाठी गुणकारी ठरते तुळस; 'हे' आहेत फायदे!
तुळशीच्या मुळांपासून तुळशीच्या बियांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी तुळस मदत करते. तसेच तुळशीचा काढाही आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.
मुंबई : तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते, असं आपण घरातील थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकत असतो. आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. घरात तुळशीचं रोप लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं, कारण तुळस अनेक आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर ठरते. अॅन्टी-बॅक्टेरियल तुळस डेंग्यू, व्हायरल फिवरपासून त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर ठरते. तुळशीच्या मुळांपासून तुळशीच्या बियांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी तुळस मदत करते. तसेच तुळशीचा काढाही आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. न्युमोनियासारख्या आजारावरही तुळस अत्यंत गुणकारी ठरते. तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही तुळस फायदेशीर ठरते. जाणून घेऊया तुळशीचे आपल्या शरीरासाठी असलेले फायदे...
ताप आणि सर्दी-खोकल्यावर तुळस गुणकारी
ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणधर्म असतात. त्यमुळे तुळशीची पाने कच्ची खाल्याने देखील ताप कमी होण्यास मदत होते. तसेच तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.
मधुमेहींसाठी गुणवर्धक
तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तुळशीचा काढा किंवा चहा तयार करून प्यायल्याने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी तुळश अत्यंत फायदेशीर ठरते.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी...
बॉडी डिटॉक्स तुळस एक नैसर्गिक डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्युरिफाइंग एजंट आहे. तुळशीच्या सेवनाने शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकता. त्याचबरोबर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम उपाय
शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला अनेत तज्ज्ञ आणि डॉक्टर्स देत आहेत. तुम्ही तुळशीच्या मदतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.
दातांचे आरोग्य राखण्यासाठीही तुळस फायदेशीर
दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो. आयुर्वेदामध्येही दातांचे आरोग्य राखण्यासाठी तुळस लाभदायी असल्याचे सांगितले आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंध येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीची पानांचा उपयोग करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
मधुमेही आहात? पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते 'ही' गंभीर समस्या
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक; जाणून घ्या मुख्य स्त्रोत
डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?
लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शनCoronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )