पावसाळ्यात मलेरिया होण्याचा धोका कमी करण्यासाठी हे 5 उपाय करुन पहा, तज्ञही सांगतात...
सध्या राज्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असताना पावसाळा सुरु झाल्यानं मलेरियाचा प्रादुर्भावही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
Precausions for Maleria: पावसाळा सुरु झाला की हिरव्यागार निसर्ग असला तरी दुसऱ्याबाजूला डासही घोंगावताना दिसतात. तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी हा ऋतू सर्दी पडशासह अनेक संसर्गजन्य रोगही घेऊन येतो. जोरदार पाऊस आणि आर्दतेत झालेली वाढ यामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक स्थिती निर्माण होते आणि डेंग्यू, मलेरिया पसरण्यास मदत होते. ॲनोफिलीस डासांमुळे मलेरिया पसरतो असं तज्ञ सांगतात. ताप, घाम येणं, अचानक थंडी वाजून तीव्र डोकेदुखी ही मलेरियाची काही लक्षणं आहेत. मलेरियाचे धोके काय? काय लक्षणं आहेत? आणि डेंग्यू, मलेरियापासून वाचण्यासाठी काय करु शकतो? जाणून घेऊया...
सध्या राज्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असताना पावसाळा सुरु झाल्यानं मलेरियाचा प्रादुर्भावही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
मलेरिया कशामुळे होतो?
मलेरियाग्रस्त व्यक्तीला डास चावल्यानंतर त्याला या रोगाचा संसर्ग होतो आणि त्याच्या संसर्गातून तो पसरू लागतो. एखाद्या व्यक्तीला हा डास चावल्यानंतर त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात काही विषारी संसर्ग मिसळले जातात. दुसऱ्या व्यक्तीला चावल्यानंतर हा डास त्यांच्या रक्तप्रवाहात परजीवी प्रवेश करतो आणि तिथेच त्याचे पुनरुत्पादन होते. याचाच संसर्ग वाढत जातो.
मलेरियाचे हे प्रमुख काही प्रकार आहेत..
प्लास्मोडियम फाल्सीपेरम (पी. फॅल्सीपेरम)
प्लास्मोडियम मलेरिया (पी. मलेरिया)
प्लास्मोडियम व्हायवॅक्स (पी. व्हायवॅक्स)
प्लास्मोडियम ओव्हल (पी. ओव्हल)
प्लास्मोडियम नोलेसी (पी. नोलेसी)
याशिवाय प्लासिपेरम मलेरियामुळे जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्यापासून एखादा माणूस कोमातही जाऊ शकतो. याउलट पी व्हायवॅक्सचे संक्रमण त्यामानाने कमी प्रमाणात गंभीर असते. परंतू याचे परिणाम काही महिन्यांपर्यंतही राहू शकतात. ज्यामुळे वारंवार मलेरियाची लक्षणं दिसू लागतात.
मलेरियाची लक्षणे काय?
मलेरियाची लक्षणे ही सर्वसामान्य फ्यू सारखीच सुरुवातीला दिसून येतात. मात्र, नंतर ती वाढतात.
ताप येणे
अचानक थंडी वाजणे, धाप लागणे
डोकेदुखी
अंग दुखणे
खोकला.
मळमळ, उलट्या
मलेरियापासून कसे वाचावे?
- मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उघड्या त्वचेवर DEET असलेले कीटकनाशक तज्ञांच्या सल्ल्याने वापरा
- बाहेर जाताना लांब भायांचे कपडे घालून जा
- तुमच्या झोपण्याच्या खोलीत डासांपासून रक्षण करण्यासाठी मच्छरदाणी किंवा किटकनाशके वापरा
- मलेरियाचा डास पातळ असल्यानं तुमच्या कपड्यांवरूनही चाऊ शकतो. त्यामुळे कपड्यांवरही किटकनाशके स्प्रे करा
- उघड्यावरचं अन्न टाळा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )