Thyroid and Pregnancy : हायपोथायरॉईडिझम असलेल्या महिलांसाठी गर्भवती होणं अधिक आव्हानात्मक, 'या' गोष्टी जाणून घ्या!
Thyroid and Pregnancy : हायपोथायरॉईडिझम असलेल्या महिलांसाठी गर्भवती होणे अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक असू शकते. गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांशी आपल्या थायरॉईड स्थितीबद्दल चर्चा करा.
Thyroid and Pregnancy : जर तुम्ही गरोदर असाल किंवा गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर थायरॉईडविषयी (Thyroid) तुमच्या अनेक शंका उद्भवू शकतात. थायरॉईड संप्रेरक पातळी कमी झाल्यान् प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तसेच गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी घातक ठरु शकते. आजकाल बहुतेक रग्णांना सबक्लिनिकल हायपोथायरॉईडिझम (Subclinical Hypothyroidism) दिसून येतो म्हणजे हार्मोनची कमतरता असूनही त्यांना लक्षणे दिसत नाहीत. कमी सक्रिय असलेल्या थायरॉईडचे निदान साध्या रक्त तपासणीद्वारे केले जाऊ शकते आणि दररोज फक्त एक गोळी घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात.
थायरॉईड ग्रंथी तुमच्या मानेजवळ असते. हे थायरॉईड संप्रेरक टी 3 आणि टी 4 तयार करते, ज्याचा तुमच्या चयापचयवर प्रक्रियेवर परिणाम होतो किंवा तुमचे शरीर ऊर्जा कसे साठवते आणि वापरते यानुसारही संप्रेरकाची पातळी बदलते. जेव्हा पातळी कमी असते तेव्हा थायरॉईडला अधिक थायरॉईड संप्रेरक तयार करण्यास सांगण्यासाठी मेंदू टीएसएच सोडतो. एखादी स्त्री गर्भधारणेची तयारी करते तेव्हा तिला आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांवर उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. हाशिमोटो थायरॉईडायटिस, ग्रेव्हस रोग किंवा थायरॉईड कर्करोग असलेल्या व्यक्ती गर्भधारणेची तयारी करत असल्यास किंवा त्यांना गर्भवती होण्याची इच्छा असल्यास ते वेगळ्या पद्धतीने कसे व्यवस्थापित करावेत याची माहिती या लेखाच्या माध्यमातून दिली आहे.
तुमच्या बाळाचे वेळोवेळी निरीक्षण करा
गरोदरपणात हायपरथायरॉईडिझम प्रमाणात असेल तर उपचारांची गरज भासत नाही. मात्र हायपरथायरॉईडिझम अधिक असल्यास डॉक्टरांनी थायरॉईड संप्रेरकाचे प्रमाण कमी करणारी अँटीथायरॉईड औषधांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. या थेरपीमुळे, तुमच्या थायरॉईड संप्रेरकाची जास्त मात्रा तुमच्या बाळाच्या रक्ताभिसरणातून बाहेर ठेवली जाते. तुम्हाला योग्य डोस मिळत असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या बाळाचे वेळोवेळी निरीक्षण करा आणि याकरिता एंडोक्रिनोलॉजिस्ट किंवा माता-गर्भाच्या औषधासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आईवर उपचार करण्यासाठी, थायरॉईड संप्रेरक बदलण्याची पद्धत वापरली जाते. थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट उपचाराचा डोस रुग्णातील थायरॉईड संप्रेरकांच्या संख्येनुसार निर्धारित केला जातो. गर्भधारणेदरम्यान, थायरॉईड संप्रेरकांची पातळी बदलू शकते. थायरॉईड रिप्लेसमेंट थेरपीचा डोस देखील बदलू शकतो. आई आणि गर्भ दोघांनाही सुरक्षित आणि आवश्यक थेरपी मिळणे आवश्यक आहे. थायरॉईड संप्रेरक पातळीची चाचणी ही सर्व नवजात बाळांसाठी नियमित तपासणीचा भाग आहे.
ऑटोइम्यून हे हायपोथायरॉईडिझमचे हल्लीचं सर्वात सामान्य कारण
गर्भधारणेदरम्यान थायरॉईड विकारांवर उपचार करण्यासाठी औषधांमुळे बाळाला इजा होणार नाही अशी औषधे वापरली जातात. थायरॉईड औषधे आपल्या शरीरात थायरॉईड संप्रेरकांची योग्य संख्या असल्याचे सुनिश्चित करण्यात मदत करु शकतात. तुम्ही गरोदर असताना तुमच्या टीएसएच, एफटी 3 आणि एफटी 4 पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या औषधांचा डोस योग्य आहे याची खात्री करण्यासाठी रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो. याला डोस देखील म्हणतात). हल्ली हायपोथायरॉईडिझमचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ऑटोइम्यून. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची एकदा अँटी-थायरॉईड अँटीबॉडीजची तपासणी करणे आवश्यक आहे.
सामान्यतः, हार्मोनची मागणी पूर्ण करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान डोसमध्ये 25 टक्के वाढ केली जाते. प्रसुती होताच महिला गर्भधारणेपूर्वीचा लेव्होथायरॉक्सिनचा डोस घेणे पुन्हा सुरु करु शकते.
गर्भधारणेपूर्व डॉक्टरांशी थायरॉईड स्थितीबद्दल चर्चा करा
हायपोथायरॉईडिझम असलेल्या महिलांसाठी गर्भवती होणे अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक असू शकते. तथापि, हायपोथायरॉईडिझम हा प्रतिबंध करण्यायोग्य आहे. गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांशी आपल्या थायरॉईड स्थितीबद्दल चर्चा करा. जर तुमची गर्भधारणा झाली असेल तर तुमची थायरॉईड स्थिती तपासा आणि तुम्ही थायरॉईड औषध घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ. जैनेश डॉक्टर, एंडोस्कोपिक सर्जन, मदरहूड हॉस्पिटल, खारघर
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )