एक्स्प्लोर

वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला

संकटकाळात धनंजय मुंडे वैजनाथाच्या दर्शनाला, वाल्मिक कराडांना मकोका लागल्याने राजीनाम्यासाठी दबाव वाढला

Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले आहे . राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या वाल्मीक कराडांवर नको का अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर परळीसह शहरात मोठा गदारोळ उडाला होता .(Parli)  दुसरीकडे सुरेश धस यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते . या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. दरम्यान , 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथच्या दर्शनासाठी मंत्री धनंजय मुंडे आज परळीत दाखल झाले होते . परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते परळीतील त्यांच्या जगन मित्र या कार्यालयात बसणार आहेत . तिथे परळीतील त्यांचे कार्यकर्ते, कामानिमित्त येणाऱ्या लोकांची भेटीगाठी करणार आहेत .

परवा सकाळी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मूळ गावी नत्रा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर काल दिवसभर परळीत  आंदोलने झाली . वाल्मीक कराड (Walmik Karad) संदर्भात न्यायालयीन कोठडीचा निर्णय झाला .अद्याप या कोणत्याही विषयावर मंत्री धनंजय मुंडे बोललेले नाहीत .ते या प्रकरणावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ही धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी शक्यता आहे . आज दिवसभर परळी शहरात ते उपस्थित असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

धनंजय मुंडे यांची कोंडी ?

मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड यांच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत . त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस ,मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरले आहेत .वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने ही मागणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे .दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असली तरी मंत्री धनंजय मुंडे परळीत वैजनाथाचे दर्शन घेत कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत . त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे .

परळीत वैजनाथाची पूजा घातली

 CID आणि SIT तपासात दररोज समोर येत असलेल्या नवनवीन खुलाशांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महायुती सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यासाठी येत असलेला दबाव आणखी किती दिवस झुगारत राहणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान,  परळीत आंदोलनाच्या वातावरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत बारा ज्योर्तिलिंगांपैकी असणाऱ्या परळी वैजनाथाचे दर्शन घेत वैजनाथाची पूजा घातली. त्यानंतर ते कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांसह लोकांशी भेटीगाठी घेणार आहेत.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Embed widget