Health: स्वयंपाकासाठी उत्तम तेल कोणतं? श्री श्री रविशंकर यांनी भक्तांना दिले आश्चर्यकारक उत्तर, म्हणाले, यामुळे कोलेस्ट्रॉल अजिबात वाढणार नाही.
Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याबाबतच्या निष्काळजीपणामुळे आणि ताणतणावामुळे अनेकांना कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दिसून येत आहेत.
Health : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याबाबत कोणतेही नियम पाळत नाहीत. अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून ते आरोग्य, ऊर्जा आणि मानसिक संतुलनाचा आधार आहे, हे लोक विसरतात. आयुर्वेद आणि आधुनिक पोषण शास्त्र दोन्ही आरोग्यदायी आहाराच्या महत्त्वावर भर देतात. खाण्यापिण्याबाबतच्या निष्काळजीपणामुळे आणि ताणतणावामुळे आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दिसून येत आहेत. त्यात अधिक तेलकट, जंकफूड खात असल्याने अनेकजणांना विविध आजारांनी ग्रासलंय, त्यामुळे आपल्या स्वयंपाकात नेमके कोणते तेल वापरावे? कोणते तेल उत्तम आहे? याबाबत अनेकांना माहित नसते, यावर गुरुदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी आपल्या भक्तांना योग्य उत्तर दिलंय. जाणून घ्या..
आवश्यक पोषक तत्वांची कमतरता
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मते, अधिक तेलकट, जंकफूड, रस्त्यावरचे पदार्थ अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. त्यानंतर अनेक वेळा सप्लिमेंट्सचा सहारा घ्यावा लागतो. अधूनमधून सप्लिमेंट्स घेणे ठीक आहे पण ते नियमितपणे घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. बहुतेक लोक बटाटे, टोमॅटो आणि वांगी यांसारख्या कमी पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. ज्यामुळे अन्नामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक आणि प्रथिनांचे प्रमाण थोडे कमी असल्याचे दिसून येते.
स्वयंपाकासाठी सर्वोत्तम तेल कोणते?
खाण्यापिण्याबाबतच्या निष्काळजीपणामुळे आणि ताणतणावामुळे आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दिसून येत आहेत. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमचे अन्न खोबरेल किंवा मोहरीच्या तेलात शिजवावे तसेच डाळी आणि भाज्यांमध्ये कढीपत्ता वापरावा.
आहारात तुपाचा समावेश करा
तसेच, शक्य असल्यास, दररोज तुपाचे सेवन करा कारण ते अन्न शुद्ध करते. आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या आणि बाजरी यांसारख्या नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. तुमच्या जेवणाच्या ताटात सॅलड, कोथिंबीर, पुदिना किंवा नारळाच्या चटणीला विशेष स्थान द्या.
हेही वाचा>>>
Health: भारतात 50 वर्षांखालील पुरुषांना धोका, प्रायव्हेट पार्ट्सला होणाऱ्या 'या' कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, 'ही' लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )