Viral : हॉटेलमध्ये मिटक्या मारत सुगंधी वासाच्या तांदळाचा भात खाताय? सतत खाल्ल्यास होऊ शकतो अपाय, जाणून घ्या कारण...
Health : सुगंधी वासाच्या तांदळाच्या सेवनाने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. जाणून घेऊया हा भात खाऊ नये? काय आहे यामागील कारण?
Health : जेव्हा जेव्हा भारतीय अन्नाचा उल्लेख होतो, तेव्हा डाळ, भात आणि चपातीशिवाय आपलं जेवणाचं ताट अपूर्ण समजलं जातं. भारतीय घरांमध्ये दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या जेवणात भात तुम्हाला सहज मिळेल. कारण अनेकांना भात खायला जास्त आवडतो. आजकाल सुगंधी भाताचा ट्रेंड वाढत चाललाय, या भाताच्या वासाने अनेकजण हा तांदूळ खरेदी करतात. तुम्हालाही जर सुगंधी वासाचा भात खायला आवडतो, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हीही रोज सुगंधी वासाचा भात खात असाल तर तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, सुगंधी वासाच्या तांदळाच्या सेवनाने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. जाणून घेऊया हा भात खाऊ नये?
सुगंधी वासाचा तांदूळ तुम्हीही मिटक्या मारत खाताय? तर सावधान...
सुगंधी वासाचा तांदूळ तुम्हीही मिटक्या मारत खात असाल, तर आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहिल्यानंतर कदाचित काही चित्र स्पष्ट होण्यास मदत तर होईलच, परंतु तुमच्या प्रश्नाचे उत्तरही मिळेल. राजेंद्र भट यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. काय म्हटलंय त्यांनी जाणून घ्या..
व्हि़डीओला 3M पर्यंत व्ह्यूज
डिजीटल क्रिएटर राजेंद्र भट हे शेतीतील अनेक बाबींबद्दल तसेच माहितीपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. त्यांचा हा व्हि़डीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत 3 मिलीयन पर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत.
पांढरा भात खाण्याचे नुकसान?
तांदळातील पोषक घटक
पांढऱ्या तांदळात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरची कमतरता असते. यामुळे आहारातील इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते.
लठ्ठपणा
जर तुम्ही आहारावर असाल म्हणजे वजन कमी करायचे असेल तर पांढरा भात खाणे टाळा. भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते.
रक्तातील साखर
पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही रक्तातील साखरेचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारातून भात वगळा.
पचन
तांदळात फायबरची कमतरता असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही रोज भात खात असाल तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
कोलेस्टेरॉल
ट्रायग्लिसराइड्सच्या वाढीमुळे कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते. त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी तांदूळ मर्यादित प्रमाणात खावे.
हृदय
रोज पांढरा भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पांढऱ्या भाताचे सेवन टाळावे.
हेही वाचा>>>
Health : 'आयुष्यात कधीच हॉटेलचे जेवण माहित नाही', 115 वर्षांच्या आजीबाईंनी सांगितले डाएट Secret, तुम्हीही व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )