(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : मोठ्या सुट्टीनंतर येतो कामाचा कंटाळा? काही करण्याची इच्छा होत नाही? 'अशा' प्रकारे दूर करा आळस
Health : दीर्घ सुट्टीनंतर कामावर परतणे खूप अवघड आहे, थकव्यामुळे काहीही करण्याची इच्छा नाही, या टिप्स आळस दूर करण्यास मदत करू शकतात.
Health : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यापासून थोडा ब्रेक घेऊन अनेकदा लोक आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला जातात. व्यस्त जीवनातून ब्रेक घेतला तर काम करण्याची उर्जा मिळते तसेच शरीर आणि मन दोन्हीही रिफ्रेश होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे लोक अशा ठिकाणी जातात, जिथे त्यांना निवांतपणा मिळेल. पण अनेकदा असं होतं की, एखाद्या मोठ्या रजेनंतर कामावर परतणे खूप कठीण होते. सुट्ट्यांमध्ये इतके छान क्षण घालवले असतात की, कामावर परतताना आळस आणि थकवा जाणवतो. त्यामुळे आपल्या कार्यशैलीवरही परिणाम होतोय. अशात, आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगत आहोत, ज्यामुळे या आळशीपणाचा सामना करण्यात मदत होईल, जेणेकरून कामावर परत जाणे सोपे होईल.
सुट्टीनंतरचा थकवा दूर करा आणि अशा प्रकारे कामावर परत या
जेव्हाही आपण सुट्टीवर जातो, तेव्हा आपल्या झोपेची पद्धत बदलते, अशा परिस्थितीत आपण नियमित झोपेची काळजी घेणे चांगले होईल.
स्वतःसाठी एक वेळापत्रक तयार करा, त्याच वेळी झोपा, जेणेकरून तुम्ही सकाळी लवकर उठून कामावर जाऊ शकता. यामुळे कामाच्या दरम्यान तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटेल.
दीर्घ विश्रांतीनंतर, तुमचा कार्यप्रवाह विस्कळीत होतो, म्हणून कामावर परत येण्यापूर्वी संपूर्ण योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.
कामासाठी तुमचे मन तयार करा, तुम्हाला कधी काय करायचे आहे याचे वेळापत्रक करा. यामुळे तुम्हाला काम सुरू करताना कोणतीही अडचण येणार नाही.
सुट्टीच्या दिवशी तुम्ही खूप पार्टी करता आणि या काळात तुम्ही भरपूर जंक फूड खाता. काहीजण मद्यपानाचे सेवनही करतात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटत नाही, म्हणून स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दिवसभरात 8 ते 9 ग्लास पाणी प्या. स्मूदी, ज्यूस, नारळ पाणी यासारख्या गोष्टींचे सेवन करा.
मोठ्या सुट्टीनंतर नक्कीच कामाला सुरुवात करा. अशावेळी व्यायाम करा, व्यायाम केल्याने आळस दूर होतो. ताजेतवाने वाटण्यास मदत होते. तुम्ही नव्या उर्जेने कामाला लागण्यासाठी सज्ज व्हा.
संतुलित आहार खाण्याची खात्री करा, पोषक तत्वांनी युक्त अन्न खाल्ल्याने तुमची उर्जा पातळी राखण्यास मदत होते.
निरोगी आहार घ्या
जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर पौष्टिक आहार घ्या. यासाठी व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, सोडियम, आयर्न आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करा. हे रक्तभिसरण सुधारेल आणि थकवा हाताळण्यास मदत करेल. याशिवाय जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
हायड्रेटेड रहा
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे देखील थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिण्याची शिफारसही डॉक्टर करतात. पाण्याशिवाय तुम्ही फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी आणि नारळपाणीही घेऊ शकता. पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुम्हाला सक्रिय वाटेल.
हेही वाचा:
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )