Health: पायांमध्ये दिसणारी मधुमेहाची 'ही' लक्षणं, फार कमी लोकांना माहित, वेळीच ओळखा...तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Health: सामान्यत: आपल्याला मधुमेहाची लक्षणं माहित असली तरी, पायांमध्ये दिसणारी या आजाराची लक्षणं कदाचित फार कमी लोकांना माहित असावी
Health: मधुमेह ज्याला इंग्रजीत डायबिटीज (Diabetes) असे म्हणतात. या मधुमेहाचे नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. भारतातील लाखो लोकांना मधुमेहाने ग्रासले आहे. त्यातील कित्येक लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबाबत माहिती नसते. सामान्यत: आपल्याला मधुमेहाची लक्षणं माहित असली तरी, पायांमध्ये दिसणारी या आजाराची लक्षणं कदाचित फार कमी लोकांना माहित असावी, यासंदर्भात मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई खारघर येथील वरिष्ठ फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. मनीष पेंडसे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या..
मधुमेहाची लक्षणे फार कमी लोकांना माहीत
मधुमेह हा एक चयापचयाचा विकार आहे, जो रक्तातील साखरेच्या उच्च पातळीद्वारे दर्शविला जातो, जो शरीराच्या पुरेसे इन्सुलिन तयार करण्याच्या क्षमतेच्या अभावामुळे उद्भवू शकतो. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. एक टाईप 1 डायबेटीज आणि दुसरा टाईप 2 डायबेटीज. टाइप 1 डायबेटीज सहसा लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि त्याचे इन्सुलिन थेरपीसह व्यवस्थापन करता येते, टाइप 2 मधुमेह हा सामान्यत: प्रौढांमध्ये विकसित होतो. उपचार न केल्यास, मधुमेहामुळे डायबेटीक न्यूरोपॅथी, मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे वेदना होणे, मुंग्या येणे, जळजळ आणि संवेदनशीलता कमी होणे, डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू आणि मोतीबिंदू, मूत्रपिंड, हृदय, यकृत, त्वचा, पित्ताशयाच्या समस्या यासारख्या गुंतागुंत होतात. यामुळे तणाव, चिंता, नैराश्य आणि कमकुवत प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते आणि ऑस्टियोपोरोसिससह हाडांच्या आजारांचा धोका वाढू शकतो. विशेष म्हणजे मधुमेहाची लक्षणे एखाद्या व्यक्तीच्या पायांवरही दिसू शकतात.
पायांवर आढळून येणारी मधुमेहाची लक्षणे
- वाढलेली तहान आणि थकवा यासारखी सामान्य लक्षणे मोठ्या प्रमाणावर मधुमेहाची लक्षणे म्हणुन ओळखली जात असली तरी, इतर लक्षकांविषयी फारशी माहिती नसते. धक्कादायक बाब म्हणजे मधुमेहाची लक्षणे पायांवरही आढळून येतात.
- मधुमेह असलेल्या व्यक्तींना अल्सर आणि संक्रमणासह पायाच्या समस्या आणि गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो. जर या समस्यांचे निराकरण केले नाही तर ते अधिक गंभीर परिस्थितीत वाढू शकतात.
- पायाचा रंग बदलणे हे अपुऱ्या रक्तप्रवाहाचे संकेत देऊ शकते, तर ऍथलीटच्या पायासारखे बुरशीजन्य संक्रमण हे मधुमेहींमध्ये महत्त्वाचे लक्षण ठरते.
- पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या आल्यासारख्या संवेदना होणे. मज्जातंतूंना परिणामामुळे अशा व्यक्तींना किरकोळ दुखापती किंवा फोडांची माहिती नसते आणि संक्रमणाचा धोका वाढतो. दुर्लक्षित परिणाम जो उपचार न केल्यास लवकर वाढू शकतो.
- दुसरे लक्षण म्हणजे त्वचेचा रंग आणि पोत बदलणे. तुम्ही कधी अचानकपणे कोरडी झालेली त्वचा किंवा भेगा पडलेल्या पाहिल्या आहेत का? मधुमेहींसाठी, अशी लक्षणे रक्त प्रवाहातीच अडथळ्यामुळे दिसून येतात. तुमचे पाय कसे दिसतात, त्यामध्ये काही बदल होतो का याकडे लक्ष ठेवा.
- मधुमेह असलेल्यांनी दररोज व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रित राखणे आणि पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले पाय व्यवस्थित धुवा आणि वाळवा, डॉक्टरांनी शिफारस केलेली पादत्राणे आणि उत्पादने वापरा आणि फुट अल्सरसाठी वेळीच उपचार करा.
हेही वाचा>>>
Men Health: पुरुषांनो.. शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढेल, 'ही' डाळ अत्यंत फायदेशीर, मिळतील 6 जबरदस्त फायदे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )