Health: तुमचा हात जगन्नाथ! काटा-चमचा नाही, तर हाताने खाण्याचे 5 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित, अनेकांना माहित नाही...
Health: तुम्हाला माहितीय का? आजकाल आपण सर्वजण काट्याने आणि चमच्याने अन्न खातो, पण हाताने खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेकांना माहित नाही. जाणून घ्या..
Health: आजकाल बदलत्या काळानुसार लोकांच्या संस्कृतीतही बदल होत चाललाय. सध्या अन्न खायचं तर काटा-चमच्याने खाण्याची पाश्चिमात्य पद्धत अनेकजण फॉलो करताना दिसतात. मात्र आजही हाताने अन्न खाण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण तुम्हाला माहित आहे का, की हाताने खाणे ही फक्त एक सवय नाही तर आयुर्वेदानुसार ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. ही पद्धत अन्नाची चव तर वाढवतेच पण आपल्या सर्व इंद्रियांना सक्रिय करते. जाणून घेऊया हाताने अन्न खाण्याचे कोणते चमत्कारी फायदे आहेत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल. ही माहिती सायन्स डायरेक्ट वेबसाइटवरून घेण्यात आली आहे.
पचन सुधारणे
जेव्हा आपण आपल्या हातांनी अन्न खातो तेव्हा आपले हात अन्नाच्या संपर्कात येतात, या प्रक्रियेत आपल्या त्वचेतून काही विशिष्ट एन्झाइम्स बाहेर पडतात. हे एन्झाइम पचनास मदत करतात. जेव्हा हे एन्झाइम सक्रिय असतात तेव्हा अन्न आपल्या पोटात सहज पचते. यामुळे अपचन किंवा पोटाच्या इतर समस्या होत नाहीत. अशा प्रकारे हाताने अन्न खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
रक्तभिसरण सुधारते
जेव्हा आपण हाताने खातो तेव्हा बोटांचा वापर केला जातो, ज्यामुळे हातांमध्ये रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे शरीरातील जडपणा (सांध्यात वेदना किंवा थकवा) कमी होते आणि आपले शरीर निरोगी राहते.
मधुमेहाचा धोका कमी
हाताने खाल्ल्यास अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स (ज्यामुळे साखरेची पातळी वाढते) कमी होते. म्हणजे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते, ज्यामुळे मधुमेहासारख्या समस्या टाळता येतात.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
जेव्हा आपण हाताने खातो तेव्हा आपल्या तोंडात आणि पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया शरीरातील संक्रमणाशी लढण्यास मदत करतात आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात, आपल्याला निरोगी ठेवतात.
भूकेची खरी जाणीव
मानसशास्त्रानुसार हाताने अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराच्या भूकेची खरी जाणीव होते. आपण हळूहळू खातो आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची गरज आहे की नाही हे कळण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्याला जास्त खाणे टाळण्यास आणि आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हेही वाचा>>>
Weight Loss: लग्न ठरलंय? झटपट वजन कमी करायचंय? एक 'असा' फॉर्म्युला, 100 टक्के फायदा मिळेल?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )