Health: आश्चर्यच! केळी खाल्ल्याने आजारांचा धोका? केळी अन् सर्दी-खोकल्याचा काय संबंध? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Health: केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे, ज्यामध्ये अनेक महत्वाची पोषक तत्वे असतात. मात्र केळी खाल्ल्याने विविध आजारांचा धोका वाढू शकतो? जाणून घ्या..
Health: केळी हे एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. हे फळ चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. केळीमध्ये भरपूर पोषक असतात, त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. केळी हे फायद्यांचे भांडार असले तरी या फळाबद्दल एक मत आहे की ते खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो. जाणून घेऊया केळीशी संबंधित काही तथ्य.
...तर केळी खाणे टाळा, तज्ज्ञ काय म्हणतात
असे मानले जाते की ज्यांना तीव्र सर्दी, खोकला होतो, त्यांनी केळी खाणे टाळावे. एवढेच नाही तर जर कोणाला यापैकी कोणताही आजार असेल तर त्याला केळी खाण्यापासून परावृत्त केले जाते. एनडीटीव्ही फूड्सच्या वृत्तानुसार, आहारतज्ज्ञ अमिता स्पष्ट करतात की सर्दी आणि फ्लूचे विषाणू नेहमीच आपल्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही आजारी असाल तर केळी खाणे टाळावे, कारण केळी तुमच्या छातीतील कफ वाढवू शकते. पण केळीमुळे कधीच थेट आजार होत नाही. डॉक्टर अमिता सांगतात की, दमा किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी केळी थोडी हानिकारक असू शकतात, केळी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे फळ मानले जाते.
View this post on Instagram
केळी खाण्याचे काही फायदे
- केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
- केळीचे रोज सेवन केल्याने पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते.
- केळी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- केळी खाल्ल्याने वजन वाढवता येते.
- रोज केळी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
सर्दी-खोकला टाळण्यासाठी काय खावे?
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुळस, आले, लवंग, हळद यांसारखी औषधी वनस्पती खाऊ शकता. याशिवाय आहारतज्ज्ञ सांगतात की बदलत्या ऋतूंमध्ये स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छता आणि झोपेची काळजी घ्या.
हेही वाचा>>>
Health: भविष्यात मुलं जन्माला येणार नाहीत? Y गुणसूत्रात घट? एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर, शास्त्रज्ञ म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )