Health: काय सांगता...तुमच्याच टूथब्रशमुळे तुम्ही आजारी पडू शकता? एका नवीन संशोधनातून माहिती समोर, जाणून घ्या...
Health: दात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारा टूथब्रशही आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. एका नवीन संशोधनात ब्रश आणि शॉवर हेड्सबद्दल धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत.
Health: दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपण रोज ब्रश करतो, कारण दातांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, तसं पाहायला गेलं तर ब्रशचे काम दात स्वच्छ करणे आहे. पण हाच ब्रश तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? हो हे खरंय... हा ब्रश वापरून तुम्ही आजारी पडू शकता, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, टूथब्रश आणि शॉवर हेडमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि जंतू असतात, त्यापैकी काही जंतू असे आहेत, ज्यांचा प्रथमच शोध लागला आहे. या संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घेऊया..
शास्त्रज्ञही आश्चर्यचकित! संशोधन काय म्हणते?
टाईम्स नाऊ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हे संशोधन नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीने केले आहे, जिथे संशोधनात त्यांना असे आढळून आले की, या रोजच्या वापरात असलेल्या गोष्टींमध्ये हजारो जंतू आहेत, त्यापैकी काही पूर्णपणे नवीन आणि अविश्वसनीय आहेत. हे संशोधन एरिका एम. हार्टमन यांनी त्यांच्या टीमसोबत पूर्ण करण्यात आले आहे. हार्टमन म्हणाले की सापडलेले जीवाणू पूर्णपणे नवीन आहेत. त्यांच्या शोधामुळे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. संशोधनात असेही म्हटलंय की, मानवाने त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जीवाणूंबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.
संशोधनात आणखी काय आढळले?
संशोधनात बॅक्टेरियोफेज नावाचा जीवाणूही सापडला आहे. जे कोणत्याही संसर्गाला आणखी वाढवते. हे बॅक्टेरिया शॉवरच्या हेड्सपेक्षा ब्रशच्या आत जास्त आढळले आहेत. हे असे लहान सूक्ष्मजंतू आहेत जे तोंडाच्या संसर्गाचा धोका वाढवतात आणि इतर अनेक मार्गांनी आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. ब्रशमध्ये आढळणारे जंतू तोंडातून पोटातही जाऊ शकतात, ज्यामुळे पोटाच्या समस्याही वाढू शकतात. हार्टमॅनने असेही म्हटले आहे की, असे काही जंतू आहेत जे निरुपद्रवी आहेत, म्हणजेच ते कोणतेही फायदे देत नाहीत आणि कोणतेही नुकसान देखील करत नाहीत.
हे जीवाणू कसे तयार होतात?
संशोधनात असे आढळून आले आहे की, टूथब्रशमध्ये जंतू येण्याचे कारण म्हणजे त्याचा पाण्याशी वारंवार संपर्क होतो. टूथब्रश ओले राहतात आणि त्यांचा सूर्यप्रकाशाशी संपर्क होत नाही, त्यामुळे ब्रशमध्ये जंतू तयार होतात. याशिवाय दात घासल्यामुळे अन्न अडकल्यानेही त्यात बॅक्टेरिया तयार होतात.
ब्रश स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग
ब्रश करण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही वेळेस धुवा.
दर 1-2 दिवसांनी गरम पाण्याने ब्रश स्वच्छ करा.
हेही वाचा>>>
Health: 'शरीरासाठी 1 दिवसात किती कॅलरीज आवश्यक आहेत रे भाऊ?' तज्ज्ञांकडून निरोगी राहण्याच्या टिप्स जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )