(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : मीच माझ्या रुपाची राणी गं..! वयाच्या 60 व्या वर्षीही 30 सारखं दिसायचंय? या 4 सवयी तुम्हाला कायम तरुण ठेवतील
Health : चांगल्या सवयीं माणसाचे वय कमी होण्याऐवजी वाढवतात. तसेच माणूस पूर्वीपेक्षा तरुण आणि उजळ दिसू लागतो. विश्वास होत नसेल तर ट्राय करून पाहा...
Health : प्रत्येकाला वाटतं, मी नेहमी चिरतरुण दिसावं, (Lifestyle News) काही लोकं वय वाढत चाललंय हे मान्य करायला तयार नसतात, कारण त्यांची इच्छाशक्ती खूप चांगली असते. वय झालेलं असलं तरी ते विविध मार्गांनी स्वत:ला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात. माणसाला कधीच वृद्ध व्हायचं नसतं, पण कधी कधी त्याच्या सवयी त्याला वेळेआधी वृद्ध करतात. मात्र चिंता करू नका, जर उतार वयात तुम्ही अशा काही सवयी अंगीकारल्या, तर या चांगल्या सवयीं माणसाचे वय कमी होण्याऐवजी वाढवतात. तसेच माणूस पूर्वीपेक्षा तरुण आणि उजळ दिसू लागतो. विश्वास होत नसेल तर ट्राय करून पाहा...
वयाच्या 60 व्या वर्षीही तुम्हाला 30 दिसायचं असेल तर...
या जगात प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते. तरुण व्यक्तीला वृद्ध व्हायचं नसतं. तर वृद्ध व्यक्तीला तरुण दिसायचं असतं. अनेक वृद्ध लोक स्वत:चे तरुण दिवस आठवतात. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या-वाईट सवयी त्याचे वृद्धत्व असूनही तरुण ठेवतात. त्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षीही तुम्हाला 30 दिसायचे असेल तर आजपासून काही चांगल्या सवयी लावा.
पुरेशी झोप
सर्वप्रथम, जर तुम्हाला तरुण राहायचे असेल तर तुमच्या झोपेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. जर जास्त वेळ झोपल्याने आळस येत असेल तर अति कमी झोपणे देखील शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे झोपेची पूर्ण काळजी घ्या आणि शरीराला पुरेशी विश्रांती देण्याचा प्रयत्न करा.
सकस आहार
व्यक्तीने नेहमी आपल्या आहारात सकस अन्नपदार्थांचा समावेश करावा. खरं तर, स्वतःला तरुण ठेवण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जास्त मांस खाणे टाळावे. जर तुम्ही फक्त भाज्या खात असाल तर जास्त तळलेले अन्न तुमच्यासाठी चांगले नाही.
दररोज शारीरिक Activity
स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमचे मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज व्यायाम किंवा ध्यान करण्याची सवय लावावी. शारीरिक हालचाली केल्याने, तुम्ही वृद्ध झाल्यावरही नेहमी तंदुरुस्त राहाल आणि तरुण अनुभवाल.
मद्यपान, सिगारेट आताच सोडून द्या
तुम्ही दारू पिण्याआधी किंवा सिगारेट पिण्याआधी विचार करत नसाल तर आता खरा विचार करण्याची गरज आहे. या सवयी तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे बनवतात. त्यामुळे अशा वाईट सवयींपासून दूर राहणे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. जर तुम्ही या सवयी स्वीकारल्या तर त्या तुम्हाला अकाली मृत्यूकडे नेऊ शकतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Saree Cancer : 'काय सांगता! साडी नेसल्यानेही कॅन्सर होऊ शकतो?' नेमका कोणता कर्करोग आहे? हा आजार भारतात कसा पसरतोय?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )