Health: 1 मिनिटात तुमचं हृदय किती वेळा धडधडते? हृदय शरीरातून बाहेर काढले तर काय होईल? हृदयाबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या
Health: हृदय हा शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हृदयाविषयी काही असे तथ्य जे कदाचित तुम्हाला माहित नसतील, जाणून घ्या
![Health: 1 मिनिटात तुमचं हृदय किती वेळा धडधडते? हृदय शरीरातून बाहेर काढले तर काय होईल? हृदयाबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या Health lifestyle marathi news How many times does the heart beat in 1 minute Know interesting facts about the heart find out Health: 1 मिनिटात तुमचं हृदय किती वेळा धडधडते? हृदय शरीरातून बाहेर काढले तर काय होईल? हृदयाबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/27/8a89ac5f571746ef22804b57d611555b1729996613245381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health: हृदय हा शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हृदयाचे काम म्हणजे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांनी युक्त रक्त सर्व धमन्यांमधून ऊती आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पंप करणे. याची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो. हृदयाविषयी काही असे तथ्य जे कदाचित तुम्हाला माहित नसतील, जाणून घ्या...
हृदयाशी संबंधित ही मनोरंजक तथ्ये
निरोगी हृदय साधारणपणे मिनिटाला 60 ते 100 वेळा धडधडते. तर महिलांचे हृदय पुरुषांच्या तुलनेत 8 वेळा जास्त धडधडत असते.
तुमचे हृदय शरीरातून काढून टाकले तरी ते धडधडत राहते. असे घडते कारण हृदयामध्ये असलेले विद्युत आवेग नेहमी सक्रिय असतात.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डार्क चॉकलेट हृदयासाठी सर्वोत्तम गोष्ट सिद्ध होऊ शकते, ते खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. फक्त मर्यादेत सेवन करा.
नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके सर्वात वेगवान असतात. त्याचे हृदय मिनिटाला 70 ते 160 वेळा धडकू शकते. वृद्धापकाळात हृदयाचे ठोके फक्त 30 ते 40 वेळा होतात.
धूम्रपान, मद्यपान, अति ताण, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत.
या लोकांना हृदयाच्या आजारांचा जास्त धोका
जे लोक जास्त वजन किंवा लठ्ठ आहेत त्यांना हृदयाच्या समस्यांचा सर्वाधिक धोका असतो. हृदय आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त आणि ऑक्सिजन पुरवते. शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या समस्याही उद्भवतात.
हृदयविकारापासून राहा सावध
हृदय हा शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. दरवर्षी 29 सप्टेंबरला 'जागतिक हृदय दिन' साजरा केला जातो. जागतिक हृदय आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश हा आहे की, व्यक्तींचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी जगाचे लक्ष वेधून घेणे. याशिवाय हा दिवस सर्वसामान्यांना हृदयविकारापासून वाचवण्यासाठी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.
हृदय निरोगी कसे ठेवायचे?
जर तुमचे वजन नियंत्रणात असेल आणि प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर हृदयाशी संबंधित समस्या आणि आजार दूर राहतील. मात्र अशा काही भाज्या आहेत, ज्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. हिरव्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वजन सहज कमी करता येते. खाली काही पदार्थ सांगितले आहेत, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात
भेंडी - हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि बीटा कॅरोटीन व्यतिरिक्त, भेंडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर देखील असतात, हे सर्व पोषक हृदय निरोगी ठेवतात.
ब्रोकोली - हृदयाच्या आरोग्यासाठी ब्रोकोली खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, क्वेर्सेटिन, कार्बोहायड्रेट्स, लोह, व्हिटॅमिन ए यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे सर्व पोषक तत्व शरीर निरोगी ठेवतात. ब्रोकोलीची भाजी, सूप, सॅलड खाऊ शकता.
गाजर - गाजर हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि ए ने समृद्ध गाजर हृदयरोगापासून संरक्षण करते. आयर्न, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि बी6 देखील गाजरात आढळतात, त्याचा आहारात समावेश केल्यास हृदय निरोगी राहते.
लसूण - जर तुम्हाला तुमचे हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असेल, तर तुमच्या आहारात लसणाचा अवश्य समावेश करा. कारण हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या भाज्यांमध्ये लसणाचाही समावेश आहे. लसणात असलेले एलिसिन तत्व खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करते.
पालक - पालक हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पालकमध्ये लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फोलेट यांसारख्या घटकांचा समावेश असतो, जे रक्त शुद्ध करतात. तसेच हृदय निरोगी ठेवते.
हेही वाचा>>>
Health: आश्चर्यच! चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात 'KISS' ची महत्त्वाची भूमिका? इतरही अनेक फायदे, जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)