Health: तासन्-तास लघवी रोखून ठेवणं बेतेल जीवावर! 5 गंभीर आजार अनेकांना माहीत नाहीत, आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Health: लघवी जास्त काळ रोखून ठेवणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी हानिकारक असू शकते. बऱ्याच वेळा अनेकजणांना हे करावे लागते. यावर आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया.
Health: आजकालची जीवन अत्यंत व्यस्त झाले आहे. काम आणि अनेक जबाबदाऱ्यांच्या गोंधळात लोकांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. याचा परिणाम अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यात आता कामाचा गडबडीत अनेक लोक लघवी तासन्तास थांबवून ठेवल्याचे निदर्शनास येते. अनेक वेळा अशी परिस्थिती येते, लघवी करावीशी वाटत असून काही कारणास्तव तासनतास लघवी करायला जमत नाही. प्रवासात किंवा पार्टीत सहभागी होताना हे अनेकदा घडते. पण तुम्हाला माहीत आहे का? लघवीला जास्त वेळ दाबून धरून बसणे ही एक गंभीर स्थिती आहे, असे केल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. होय, लघवी रोखून ठेवल्याने काही दुष्परिणाम होतात. यावर तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. बोपण्णा वेंकट बी हे लघवी रोखून ठेवण्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगतात. ते यूरोलॉजिस्ट आहेत, ते सांगतात की लघवीला बराच वेळ रोखून ठेवल्याने आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो. यामुळे या सर्व समस्या उद्भवू शकतात.
लघवी थांबल्याने होऊ शकतात या 5 समस्या
मूत्राशयात कमकुवतपणा - लघवी दीर्घकाळ रोखून ठेवल्याने आपल्या मूत्राशयाच्या स्नायूंवर दबाव येतो, ज्यामुळे मूत्राशय कमकुवत होते आणि भविष्यात लघवी नियंत्रित करण्यात अडचण येऊ शकते.
किडनीवर परिणाम- लघवीला वारंवार थांबवल्यास आपल्या किडनीवर दबाव वाढतो आणि त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो. यामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो.
पोट आणि मूत्राशय संक्रमण - लघवी थांबवण्यामुळे मूत्राशयात भरलेल्या लघवीमध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतात, ज्यामुळे पोट आणि मूत्राशय संक्रमण म्हणजेच इन्फेक्शन होऊ शकते.
गॅस्ट्रोची समस्या - जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने पोटात दाब निर्माण होतो, ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये गॅस आणि ॲसिडिटीचा समावेश असू शकतो.
UTI - जेव्हा तुम्ही लघवीला धरून राहता तेव्हा मूत्राशयात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. यूटीआयची अनेक कारणे असू शकतात, जसे की डिहायड्रेशन आणि स्वच्छता न राखणे.
काय करावे?
- जेव्हा केव्हा लघवी करावीशी वाटेल, तेव्हा जास्त काळ रोखून न ठेवता लगेच करा.
- जर तुम्ही दिवसातून 6-8 वेळा लघवी करत असाल तर ते सामान्य आहे.
- पुरेसे पाणी प्या आणि मूत्राशय भरू देऊ नका.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो..पहाटेची 'ही' वेळ अत्यंत जीवघेणी, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )