एक्स्प्लोर

Health : पित्ताशयाचे खडे फक्त प्रौढांनाच नाही, तर लहान मुलं, तरुणांनाही होऊ शकतात! लक्षणं, समज-गैरसमज जाणून घ्या, डॉक्टर सांगतात.. 

Health : पित्ताशयाच्या खड्यांबाबत असंख्य समज आणि गैरसमज आहेत, ज्यामुळे गोंधळ, चुकीची माहिती मिळते

Health : अनेकदा आपण ऐकतो की पित्ताशयाचे खडे हे फक्त वयस्कर लोकांनाच होतात. पण हा एक गैरसमज आहे, पित्ताशयातील खडे लहान मुले आणि तरुण प्रौढांसह सर्वच वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकतात. याची लक्षणं काय आहेत? याबाबत समज-गैरसमजाबाबत डॉ अपर्णा गोविल भास्कर माहिती देत आहेत. डॉ. भास्कर या सल्लागार आहेत. तसेच मुंबई येथील मेटाहेल- लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्सच्या त्या बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन देखील आहेत. जाणून घेऊया सविस्तर..

पित्ताशयातील खडे आणि त्याबाबत असलेले गैरसमज

डॉ अपर्णा भास्कर सांगतात की, "पित्ताशयातील खडे ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे, जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. पित्ताशयामध्ये हे छोटे, कडक खडे, दगड तयार होऊ शकतात, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण होतात. या स्थितीबद्दल असंख्य समज आणि गैरसमज आहेत, ज्यामुळे गोंधळ आणि चुकीची माहिती मिळते. या लेखात, आम्ही पित्ताशयाच्या खड्यांबाबत असलेल्या काही प्रचलित मिथकांचा शोध घेऊ, गैरसमज दूर करू आणि या स्थितीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अचूक माहिती देऊ"

चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पित्ताशयाचे खडे होतात. हा देखील एक गैरसमज आहे. उच्च चरबीयुक्त आहार हा पित्ताशयातील खडे तयार करण्यास कारणीभूत ठरू शकतो, परंतु हेच एकमेव कारण नाही. आनुवंशिकता, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, जलद वजन कमी होणे आणि मधुमेह किंवा यकृत रोग यासारख्या काही वैद्यकीय परिस्थिती देखील यास कारणीभूत ठरतात.

पित्ताशय काढून टाकल्याने वजन वाढते हा एक गैरसमज असून पित्ताशय काढून टाकल्याने वजन वाढण्याशी थेट संबंध नाही. शस्त्रक्रियेनंतर कमी झालेल्या शारीरीक हलचालीमुळे वजन वाढू शकते. संतुलित आहार आणि व्यायाम शस्त्रक्रियेनंतरचे वजन नियंत्रित राखण्यास मदत करू शकतो.

लहान आकाराच्या खड्यांना शस्त्रक्रियेची गरज नसते

पित्ताशयातील अनेक लहान खडे अधिक धोकादायक असतात कारण ते सामान्य पित्त नलिका किंवा स्वादुपिंडाच्या नलिकेमध्ये सरकतात. यामुळे कावीळ किंवा तीव्र पित्ताशयातील खडे,  स्वादुपिंडाचा दाह होऊ शकतो. तुम्हाला पित्ताशयातील खड्यांची समस्या असल्यास लवकरात लवकर वैद्यकिय तज्ज्ञांची भेट घ्या.

पित्ताशयातील खडे औषधोपचार किंवा नैसर्गिक उपायांनी विरघळतात हा एक गैरसमज आहे. औषधे आणि नैसर्गिक उपायांमुळे काही व्यक्तींना भविष्यात खडे तयार होण्यास प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते, परंतु सामान्यतः पित्त खडे विरघळू शकत नाहीत. पित्ताशयाच्या खड्यांसाठी अनेकदा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.

पित्ताचे खडे काढून टाकल्याने पाचन समस्या उद्भवतात हा एक गैरसमज आहे. खडे काढून टाकल्यानंतर तात्पुरते पचन समस्या उद्भवू शकते. जसे की जुलाब किंवा पोट फुगणे या समस्या अनेकदा कालांतराने सुधारतात. शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर अनेक व्यक्ती सामान्य आहार आणि जीवनशैलीस पुन्हा सुरूवात करू शकतात.

पित्ताशयाच्या खड्यांसाठी नेहमी त्वरित शस्त्रक्रिया करावी लागते हा एक गैरसमज आहे. सर्वच पित्ताशयाच्या खड्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते, विशेषत: जर तीव्र लक्षणे उद्भवत नसतील. लहान खडे असल्यास किंवा पित्ताशयाचा दाह यासारख्या गुंतागुंत असल्यास, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

पित्ताशयाचे खडे फक्त महिलांनाच होतात हा एक गैरसमज आहे. वास्तविकता पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही पित्ताशयाच्या खड्यांची समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेदरम्यान किंवा हार्मोनल औषधे घेत असताना या समस्येता शक्यता अधिक असते.

पित्ताशय शुद्धीकरण करणे किंवा डिटॉक्स हे पित्ताशयातील खडे बरे करू शकतात हा एक गैरसमज आहे. वास्तविकता पित्ताशयाच्या खड्यांवर उपचार करताना पित्ताशय शुद्धीकरण किंवा डिटॉक्सच्या प्रभावीतेचे समर्थन करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. या पद्धती धोकादायक असू शकतात आणि त्यांची शिफारस केलेली नाही.

पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमध्ये केवळ खडे काढले जातात हा एक गैरसमज आहे. पित्ताशयाची शस्त्रक्रिया यामध्ये केवळ खडे नव्हे तर संपूर्ण पित्ताशय काढून टाकणे समाविष्ट असते. पित्ताशय काढून टाकल्याने भविष्यातील पित्ताशयाचे खडे आणि संबंधित गुंतागुंत टाळता येते.

तुम्हाला पित्ताशयाचे खडे किंवा संबंधित लक्षणे असल्यास अचूक निदान, उपचार पर्याय आणि मार्गदर्शनासाठी वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेची भीती अनेक वेळा व्यक्तींना पित्ताशयाच्या खड्यांवर वेळीच उपचार घेण्यापासून रोखू शकते. दुर्दैवाने, भीतीमुळे पित्ताशयावरील शस्त्रक्रिया टाळल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि आरोग्याची एकूण स्थिती बिघडू शकते.

हेही वाचा>>>

Health : ऑफिसमध्ये तासन्-तास बसून तुमचंही वजन वाढलंय? सावधान.. विविध आजारांना देताय निमंत्रण, कारणं आणि टिप्स जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Embed widget