Health: काय सांगता! अंडी हृदयासाठी हानिकारक? संशोधनात काय म्हटलंय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Health: अंडी हे आरोग्यदायी आणि पौष्टिक गुणधर्मांचा खजिना मानला जातो. मात्र फायदेशीर असूनही, काही लोकांना अंडी खाणे टाळण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या.
Health: संडे हो या मंडे...रोज खा अंडे.. हे आपण नेहमीच ऐकत आले. अंडी म्हणजे आरोग्यदायी आणि पौष्टिक गुणधर्मांचा खजिनाच...निरोगी आहारामध्ये अंड्यांचा वापर केला जातो. जगभरातील लोक दररोज नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अंडी खातात. अंडी हा प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत मानला जातो, म्हणून दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो. उकडलेले अंडे, ऑम्लेट, हाफ फ्राय अशा अनेक प्रकारे अंडी खाल्ली जातात. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळून आले की, अंड्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जास्त वेळ शिजवलेले अंडे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो. याबद्दल जाणून घ्या
अंडी आरोग्यासाठी घातक?
संशोधनानुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 186 मिलीग्राम कोलेस्टेरॉल असते, त्यापैकी बहुतेक अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये असतात. त्याला एग योक असेही म्हणतात. या अंड्यातील पिवळं बलक हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. रिसर्च टीमने दररोज 1 अंडे खाण्याचा सल्ला दिला असला तरी ते व्यवस्थित शिजवून खाल्ल्यासच फायदे मिळतात असेही त्यांनी सांगितले आहे. अंड्यांमध्ये असलेले कोलेस्टेरॉल शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि तणाव वाढवते.
Oxysterols म्हणजे काय?
Oxysterols, हा एक संयुग घटक आहे, जो अंड्यांमध्ये असतो. जेव्हा हा घटक उष्णतेच्या संपर्कात येतो तेव्हा अंडी हानिकारक ठरतात. हा घटक जास्त वेळ उकळल्यावर किंवा इतर कोणत्याही प्रकारे शिजवल्यावर अधिक सक्रिय होतो. यानंतर, या अंड्यांचे सेवन केल्याने, ते शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
हृदयरोग्यांनी अंडी का टाळावीत?
हृदयाचा आजार असलेल्यांनी अंडी खाणे टाळावे याला संशोधनात पुष्टी मिळालेली नसली तरी, असे नक्कीच म्हटले आहे की, जर तुम्ही आधीच हृदयाचे रुग्ण असाल, उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल किंवा असंतुलित कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल, तर तुम्ही अंड्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. योग्य प्रकारे शिजवलेले अंडे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
अंडी खाण्याची योग्य पद्धत
- अंडी उकडल्यानंतरच खा.
- जर तुम्हाला तळलेले अंडे खायचे असतील तर ते ऑलिव्ह ऑईल किंवा ॲव्होकॅडो तेलात शिजवा.
- अंडी थोड्या वेळासाठी म्हणजे फक्त मऊ होईपर्यंत उकडा.
- अंडी भाज्यांसोबत खाणे अधिक फायदेशीर आहे.
हेही वाचा>>>
Diwali 2024: सावधान! सणासुदीत तुम्ही भेसळयुक्त मिठाई तर खात नाही ना? मिठाईतील भेसळ कशी ओळखाल? घरीच करा चाचणी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )