Health: सावधान! तुमच्या बेडशीटपासून तुम्हाला धोका? गंभीर आजाराची शक्यता! 1 बेडशीट किती दिवस वापरावी? अभ्यासात बाब उघड
Health: बेडशीटमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? दर तीन-चार दिवसांनी बेडशीट का बदलावी? काय नुकसान होते? जाणून घ्या...
Health: एकीकडे आपण आपल्या स्वच्छतेची पूर्णत: काळजी घेतो. रोज कपडे बदलतो आणि स्वच्छ कपडे घालतो. निरोगी आरोग्यासाठी योग्य आहारासोबतच आपल्या सभोवतालच्या गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा आपण आजारी पडू शकतो. पण दुसरीकडे जेव्हा बेडशीटचा प्रश्न येतो, तेव्हा काही लोक अनेक आठवडे तीच बेडशीट ठेवतात. बरेच लोक त्यांच्यावर डाग दिसू लागेपर्यंत ते बदलत नाहीत. पण असे करणे योग्य आहे का? बेडशीटमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? जाणून घ्या...
बेडशीटपासून तुम्हाला धोका? गंभीर आजाराची शक्यता!
दर महिन्याला बेडशीट बदलल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? की दर तीन-चार दिवसांनी बेडशीट बदलावी का? तुमचाही असाच गोंधळ असेल तर, जाणून घ्या...2021 मध्ये Dunlopils द्वारे एक अभ्यास केला गेला, ज्यामध्ये असे दिसून आले की 10.2% लोक दर 2 महिन्यांनी त्यांच्या खोलीतील बेडशीट बदलतात. तर 44.9% पेक्षा कमी लोक दर एक ते दोन आठवड्यांनी बेडशीट बदलतात. याशिवाय 2012 मध्ये नॅशनल स्लीप फाऊंडेशनने लोक त्यांच्या घरातील बेडशीट किती वेळा बदलतात यावरही सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, त्यावेळी लोक दर दोन आठवड्यांनी त्यांच्या खोलीची बेडशीट बदलतात. बेडशीट वेळोवेळी बदलली पाहिजे, अन्यथा त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ लागतात, ज्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकते. आठवड्यातून किती वेळा बेडशीट बदलावी
दर तीन-चार दिवसांनी बेडशीट का बदलावी?
तज्ज्ञांचे मत आहे की लोकांनी किमान दर आठवड्याला त्यांच्या बेडशीट बदलल्या पाहिजेत. अन्यथा ते आजारीही पडू शकतात. खरे तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बेडशीटवर जाणुन किंवा नकळत धुळीचे कण साचतात, जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास तो आजारी पडू शकतो.
बेडशीट दर आठवड्याला का बदलावी?
ऍलर्जी
जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा ॲलर्जीचा त्रास होत असेल तर दिवसातून एकदा किंवा दोनदा बेडशीट बदलावी अन्यथा ॲलर्जीची समस्या आणखी वाढू शकते. याशिवाय, तुम्ही आजारी असाल तरीही, तुम्ही बेडशीट वारंवार बदलली पाहिजे.
जास्त घाम येणे
काही लोकांना झोपताना खूप घाम येतो, त्यामुळे चादरीतही घामाचा वास येऊ लागतो. जर तुम्हाला झोपताना घाम येत असेल तर दररोज बेडशीट बदला, अन्यथा तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता आहे.
पाळीव प्राणी
ज्या लोकांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी दररोज त्यांच्या बेडशीट बदलल्या पाहिजेत. जर तुमचा पाळीव प्राणी तुमच्यासोबत अंथरुणावर झोपला असेल तर चादर गरम पाण्यात धुवावी.
हेही वाचा>>>
Women Health: गर्भधारणेसाठी 'बीट' खरोखर फायदेशीर आहे का? रोज खाण्याचे फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल, आहारतज्ज्ञ सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )