(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Health: गर्भधारणेसाठी 'बीट' खरोखर फायदेशीर आहे का? रोज खाण्याचे फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल, आहारतज्ज्ञ सांगतात..
Women Health: आहारतज्ज्ञ सांगतात की, दररोज बीटरूटचे सेवन केल्यास ज्या महिलेला आई व्हायचं असेल तिला गर्भधारणा होण्यास मदत होते. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Women Health: आई होणं हे प्रत्येक महिलेसाठी आनंदाची बाब असते, हा एक वेगळाच सुखद अनुभव असतो, मातृत्व निसर्गानं दिलेलं एक वरदान मानले जाते. अशात आता बदलती जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण, अनेक जबाबदाऱ्यांमुळे महिला शक्यतो स्वत:ची काळजी घ्यायला विसरतात. अशात आई व्हायचं असेल तर प्रजनन समस्या ही एक वाढती समस्या आहे, जी गंभीर बाब होत चालली आहे. आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दररोज बीटचे सेवन केल्याने महिलांचा प्रजनन दर वाढतो. चला जाणून घेऊया याचे कारण आणि ते खाण्याचे फायदे.
बीट खाल्ल्याने प्रजनन क्षमता सुधारते?
आहारतज्ज्ञ सांगतात की, बीट हे खूप पौष्टिक अन्न आहे जे आरोग्यासाठी अनेक फायदे देते. त्यात फॉलिक ॲसिड, लोह, नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. बीट खाल्ल्याने प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. बीटचे सेवन हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी प्रभावी मानले जाते. आहारतज्ज्ञ प्रेरणा सांगतात की, दररोज बीटरूटचे सेवन केल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया. यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या डायटिशियन प्रेरणा यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला ही माहिती सांगत आहोत. प्रेरणा अनेकदा तिच्या यूट्यूब पेजवर लोकांशी आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करते.
बीट गर्भधारणेसाठी कसा मदत करतो?
आहारतज्ञ प्रेरणा म्हणतात की, बीट हे नैसर्गिक व्हायग्रासारखे आहे, जे प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. बीट खाल्ल्याने स्त्रीच्या गर्भाशयाचे अस्तर मजबूत होते, जे गर्भधारणा टिकवून ठेवण्यास मदत करते. बीट रक्तवहिन्यासंबंधी कार्य सुधारते, ज्यामुळे रक्त प्रवाह आणि परिसंचरण सुधारते. ही सर्व कारणे आहेत, ज्यामुळे प्रजनन दर वाढतो. बीट खाल्ल्याने शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते, जे गर्भधारणेसाठी महत्वाचे आहे. बीटरूट खाल्ल्याने हार्मोनल असंतुलन नियंत्रित होते, ज्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता सुधारते.
रोज बीट खाण्याचे फायदे
- बीट खाल्ल्याने लाल रक्तपेशी वाढते.
- बीट खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीज मिळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
- बीट फायबरचा स्त्रोत आहे, जे पचन सुधारते.
- बीट खाल्ल्याने लघवीच्या समस्या दूर होतात.
- दररोज बीट खाल्ल्याने त्वचेची चमक वाढते.
बीट कसे खावे?
- तुम्ही बीटचा रस पिऊ शकता.
- बीटरूट सलाड खाणे देखील फायदेशीर ठरेल.
- तुम्ही बीट सूप बनवून हिवाळ्यात पिऊ शकता.
हेही वाचा>>>
Women Health: जुळं... तिळं... एखाद्या स्त्रीला एका वेळी एकापेक्षा जास्त मुलं कशी होतात? कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )