Health: फक्त 1 उकडलेलं अंड अन् हजारो फायदे! विविध पोषक घटकांचा खजिना, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
Health: फक्त 1 उकडलेले अंडे खाणे सुरू करा, तुमचे अनेक आजार दूर राहतील. आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, वेळेचा अभाव, व्यायामाच्या अभावामुळे अनेकांना वाढत्या वजनाने ग्रासलंय. अशात परिपूर्ण नाश्ता करण्यासाठी अनेकांकडे वेळ नसतो, ज्यामुळे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक पुरेसे मिळत नाही, ज्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एक पदार्थाबद्दल सांगणार आहोत. जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला पोषक घटक तर मिळतीलच, सोबत अनेक आजारही दूर राहतील, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या...
उकडलेले अंडे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
शरीर नेहमी उर्जेने परिपूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे. यामध्ये उकडलेले अंड तुम्हाला मदत करू शकते. उकडलेले अंडे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्याचा पांढरा भाग हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. तज्ज्ञ म्हणतात की दररोज 1 उकडलेले अंडे खाल्ल्याने स्नायूंच्या वाढीस मदत होते. यासोबतच अनेक फायदेही आपल्या शरीराला मिळतात. जाणून घ्या..
उकडलेल्या अंड्याचे फायदे जाणून थक्क व्हाल
अंड्याचा पांढरा भाग हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकता. मेंदूला चालना देण्यासोबतच शरीरातील स्नायू तयार करण्यासही हे उपयुक्त आहे.
अंड्यांमध्ये विविध पोषक घटकांचा खजिना
अंडी हे अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. यामध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए, बी6, बी12, फोलेट, अमिनो ॲसिड आढळतात. याशिवाय, फॉस्फरस आणि सेलेनियम हे अत्यावश्यक असंतृप्त फॅटी ऍसिडस् (लिनोलिक, ओलेइक ऍसिड) मध्ये आढळतात, जे लहान मुलांच्या तसेच वृद्ध लोकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांनी उकडलेले अंडे खाण्याचे फायदे सांगितले आहेत. त्या म्हणाल्या की, अंड्यांमध्ये आढळणारे जीवनसत्व त्वचा आणि दृष्टीसाठी चांगले आहे. हे व्हिटॅमिन बी आणि लोहाचे समृद्ध स्त्रोत आहे, जे चांगल्या हिमोग्लोबिनच्या पातळीत योगदान देते.
उकडलेले अंडे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
- वजन कमी करण्यास उपयुक्त.
- दृष्टी सुधारते.
- अंड्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
- तणाव दूर करण्यासाठी अंडी फायदेशीर आहे.
- त्वचा आणि केसांसाठीही अंडी फायदेशीर आहे.
- रक्तातील रक्त पेशी सुधारते.
- अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
उकडलेले अंड खाण्याची योग्य वेळ
उकडलेले अंड खाण्याची योग्य वेळ म्हणजे नाश्त्यात अंडी खाणे जास्त फायदेशीर असते. अंड्याची डिश तयार करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात.
हेही वाचा>>>
Health: आश्चर्यच! चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात 'KISS' ची महत्त्वाची भूमिका? इतरही अनेक फायदे, जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )