एक्स्प्लोर

Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं

Eknath Shinde & Devendra Fadnavis: महायुतीमध्ये सध्या अंतर्गत पातळीवर प्रचंड खदखद दिसून येत आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की

मुंबई: राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian minister) जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने हे प्रकरण बरेच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पालकमंत्र्यांचा यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर फडणवीस परदेशात गेले होते. परंतु, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. त्यामुळे एरवी आपल्या निर्णयांवर ठाम राहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना तातडीने आदेश जारी करत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली होती. 

एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदांच्या वाटपावरुन नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळगावी जाऊन बसल्याची चर्चा कालपासून रंगली आहे. शिवसेनेतील 20 आमदार फुटणार, या चर्चेने या सगळ्या अस्वस्थतेत आणखी भर टाकली. उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटातील 20 आमदारांचा गट फुटून भाजपसोबत जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या सगळ्याचा पालकमंत्री पदाच्या स्थगितीशी काही संबंध आहे का, अशी शंका आता घेतली जात आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील दरे या गावी जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून सर्वकाही आलबेल आहे, असे सांगितले जात असले तरी पडद्यामागे अजूनही धुसफूस आणि राजकीय घडामोडी सुरु असल्याचे सांगितले जाते.

एकनाथ शिंदे फडणवीसांच्या निर्णयामुळे अस्वस्थ

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एसटी बसेस खरेदीची निविदाच रद्द केली होती. तसेच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीने 'सिडको'च्या अध्यक्षपदावरुन पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते. या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

भाजपची भूमिका काय?

एकनाथ शिंदे हे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र, ते न मिळाल्याने शिंदे नाराज झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. कोकणातील कोणत्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद न मिळाल्याने अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले. तर नाशिकमध्ये आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहावे, यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे. 

आणखी वाचा

उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Embed widget