एक्स्प्लोर

Health: 'हँगओव्हर' उतरण्यासाठी पाणी पिणं अयोग्य? 'या' एका संशोधनामुळे तुमच्या सवयी बदलतील, जाणून घ्या

Health: तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल, तितके तुम्हाला हँगओव्हर होण्याची शक्यता जास्त असते, यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हीही जास्त पाणी पिता का? या संशोधनामुळे तुमच्या सवयी बदलतील

Health: अनेकवेळा असे होते की, हँगओव्हर कमी करण्यासाठी अनेक पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्यामध्ये लिंबू पाणी पिणे, दही खाणे, याशिवाय आंबट पदार्थ खायला दिले जातात. हॅंगओव्हरचा ज्या लोकांना जास्त त्रास होतो, त्यांना अधिक पाणी दिले जाते. कारण असे मानले जाते की, हँगओव्हर कमी होण्यासाठी जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे मळमळ, डोकेदुखी आणि थकवा यापासून आराम तर मिळेलच. पण हँगओव्हरबाबत केलेल्या एका संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे तुमच्या सवयी बदलतील. जाणून घ्या...

हँगओव्हर कमी करण्यासाठी पाणी पिणं किती योग्य?

हँगओव्हरमध्ये मळमळ, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या कमी होण्यासाठी पाणी पिणे हा उपाय मानला जातो. पण तुम्हाला वाटतं तितके ते प्रभावी आहे का? अलीकडेच या संबंधित एक अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये हँगओव्हर कमी करण्यासाठी अधिक पाणी पिण्याच्या कल्पनेचे खंडन करण्यात आले आहे.

नवीन अभ्यास काय म्हणतो?

या अभ्यासात नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठातील संशोधकांकडून दोन गटांवर संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये पहिल्या गटाने रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान केले आणि नंतर पाणी प्यायले. दुसरा गट मद्यपानानंतर पाणी न पिणाऱ्यांचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दोन्ही गटातील लोक उठले, तेव्हा प्रत्येकाला वेदना, मळमळ आणि थकवा यासारख्या तक्रारी होत्या. पाणी प्यायलेल्या गटाने त्यांची तहान कमी होत असल्याची तक्रार केली, असे असले तरी, हँगओव्हर दोघांसाठी समान होते.

हँगओव्हर पाण्याने बरा होत नाही?

अभ्यासात असे म्हटले आहे की, याचे परिणाम दर्शविते की मद्यपान करताना किंवा नंतर पाणी पिल्याने हँगओव्हर कमी होत नाही. अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जोरिस वर्स्टर यांनी सांगितले की, पाणी न पिल्याने डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण होऊ शकते. परंतु शरीरातील निर्जलीकरण हे हँगओव्हरच्या लक्षणांचे प्राथमिक कारण असू शकत नाही. तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल, तितके तुम्हाला हँगओव्हर होण्याची शक्यता जास्त असते, असे ते म्हणाले. पाणी प्यायल्याने तहान आणि कोरडे तोंड यापासून आराम मिळतो, परंतु यामुळे डोकेदुखी आणि मळमळ कमी होत नाही.

हँगओव्हरसाठी उपचार काय आहे?

हँगओव्हरच्या उपचारांसाठी, अभ्यासात असे म्हटले आहे की, त्यावर कोणताही उपचार अस्तित्वात नाही. वाढत्या वयानुसार हँगओव्हरची समस्या वाढते हे आकडेवारी आणि संशोधन मान्य करतात. वाढत्या वयाबरोबर लिव्हरच्या समस्याही सुरू होतात. ज्यामुळे हँगओव्हर वाढतो.

हेही वाचा>>>

Health: बिअरमुळे कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Atul Benke: अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
Crime News:'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
Worli vidhan sabha: वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मेगाप्लॅनिंग, भाजपचा बडा नेता किंवा शिंदे कुटुंबातील व्यक्ती रिंगणात?
वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मेगाप्लॅनिंग, भाजपचा बडा नेता किंवा शिंदे कुटुंबातील व्यक्ती रिंगणात?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी विश्व हिंदू परिषद सक्रिय, काय आहे प्लॅनिंग?
विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी विश्व हिंदू परिषद सक्रिय, काय आहे प्लॅनिंग?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Khed Shivapur : पुणे खेड शिवापूर 5 कोटींच्या रोकडप्रकरणी 4 जणांना अटकABP Majha Headlines : 10 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Voters : लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संख्येत 35 लाखाने वाढMaharashtra Education : दहावीत गणित आणि विज्ञानात 20 गुण मिळाले तरी अकरावीत प्रवेश मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Atul Benke: अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
Crime News:'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
Worli vidhan sabha: वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मेगाप्लॅनिंग, भाजपचा बडा नेता किंवा शिंदे कुटुंबातील व्यक्ती रिंगणात?
वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मेगाप्लॅनिंग, भाजपचा बडा नेता किंवा शिंदे कुटुंबातील व्यक्ती रिंगणात?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी विश्व हिंदू परिषद सक्रिय, काय आहे प्लॅनिंग?
विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी विश्व हिंदू परिषद सक्रिय, काय आहे प्लॅनिंग?
Manoj Jarange: आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
Mangal Gochar 2024 : ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
Embed widget