Health Care Tips : 'हे' पदार्थ तुमची हाडे निरोगी ठेवतील, करा आहारात समावेश
Minerals For Body : लोह, कॅल्शियमची कमतरता भासत असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
Minerals For Body : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वांसोबत खनिजांचीदेखील गरज असते. बऱ्याचदा खनिजांच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष केले जाते. आजही बऱ्याच लोकांना खनिजांचे महत्त्व आणि त्यांचे फायदे माहीत नाहीत. खनिजे हाडे मजबूत करतात आणि स्नायू दुरुस्त करतात. खनिजांच्या कमतरतेमुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. शरीरातील खनिजांची कमतरता तुम्ही संतुलित आहाराच्या मदतीने भरून काढू शकता.
लोह (Iron) : शरीरात लोहाची कमतरता कमी असेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हिमोग्लोबिनदेखील कमी होत असते. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी पालक, बीटरूट, डाळिंब, सफरचंद, पिस्ता, आवळा, सुकामेवा आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.
कॅल्शियम (Calcium) : कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, मसूर, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, वाटाणे, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया आणि संत्री यांचा समावेश करायला हवा. कॅल्शियम न्यूरोनल फंक्शन्स नियंत्रित करते आणि हाडे मजबूत करते.
झिंक (Zinc) : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झिंकचे सेवन केले पाहिजे. भाजलेले बीन्स, दूध, चीज, दही, लाल मांस, हरभरा, डाळ, भोपळा, तीळ, शेंगदाणे, काजू, बदाम, अंडी, गहू आणि तांदूळ यासारख्या पदार्थांमध्ये झिंक आढळते.
मॅग्नेशियम (Magnesium) : हाडे मजबूत करण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आहारात मॅग्नेशियमसाठी शेंगदाणे, सोया दूध, काजू, बदाम, पालक, ब्राऊन राइस, सॅल्मन, चिकन यांसारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
पोटॅशियम (Potassium) : हृदय निरोगी ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे. शरीरातील पोटॅशियमची कमतरता रताळे, वाटाणे, भोपळा, बटाटे, केळी, संत्री, काकडी, मशरूम, वांगी, बेदाणे, खजूर अशा पदार्थांनी भरून काढता येते.
सेलेनियम (Selenium) : शरीरात सेलेनियमच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात. तसेच सांधेदुखीसारख्या समस्यांनादेखील सामोरे जावे लागते. सोया दूध, डुकराचे मांस, चिकन, मासे, अंडी, केळी, ब्लूबेरी यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला फायदा होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
World AIDS Day 2021 : आज जागतिक एड्स दिन, HIV व्हायरसबद्दलचे गैरसमज काय? लक्षण काय? कसा कराल बचाव?
Good Health Care Tips : सावधान! जेवणानंतर तुम्ही 'या' चुका तर करत नाहीत ना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )