(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकाळी मेथीचे दाणे, ओव्याचं पाणी प्यायल्यानं झटपट कमी होईल वजन; 'या' आजांरावरही गुणकारी
तुम्हाला जर घरच्या घरी झटपट वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेले पाणी प्या. जाणून घेऊयात मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेल्या पाण्याचे फायदे
Ajwain And Methi Water : वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. तर काही जण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. तुम्हाला जर घरच्या घरी झटपट वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेले पाणी प्या. जाणून घेऊयात मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेल्या पाण्याचे फायदे-
झटपट कमी होईल वजन- मेथीचे दाणे आणि ओव्यामध्ये अँटीऑक्सीडेंट असतात. जे शरीरातील मेटाबॉलिज्म मजबूत करतात. ओवा आणि मेथीचे दाणे मिक्स केलेले पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज एक ग्लास ओवा आणि मेथीचे दाणे टाकलेले पाणी पिले पाहिजे.
जर तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढते किंवा कमी होत असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मेथी आणि ओवा मिक्स केलेले पाणी प्यावे
पचन क्रिया सुधारते- सकाळी अनोशा पोटी मेथीचे दाणे आणि ओवा मिक्स केलेले पाणी जर तुम्ही पिले तर तुमची पचन क्रिया सुधारेल तसेच या पाण्यामुळे बॉडी स्ट्रेस देखील कमी होतो.
इम्यूनिटी वाढेल- मेथीचे दाणे आणि ओवा मिक्स केलेले पाणी हे एक डिटॉक्स ड्रिंक आहे. यामध्ये अॅंटीऑक्सीडेंट, विटामिन सी आणि प्रोटीन हे पोषक तत्वे असतात. या पाण्याने शरीरात इम्यूनिटी देखील वाढते.
तसेच सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )