एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hair Care Tips : केसगळतीचा त्रास नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Hair Care Tips : केसगळतीचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे. तसेच सर्जरीमुळे देखील केसगळतीचा सामना करावा लागतो.

Hair Care Tips : बदलत्या ऋतूनुसार, शरीरावर देखील अनेक बदल होतात. हे बदल काही चांगले असतात तर काही वाईट असतात. असाच एक बदल म्हणजे केसगळती (Hairfall). केसगळतीची समस्या लहान मुलांपासून ते महिला, पुरुषांमध्ये होते. अधिकतर महिलांमध्ये केसगळतीचा त्रास जास्त जाणवतो. मात्र, केसगळती फक्त बदलत्या ऋतुमुळे होत नाही. तर यामागेही अनेक कारणे आहेत. केसगळतीची समस्या का होते? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि केसगळतीवर उपचार काय? या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

केस गळतीच्या समस्येबाबत सांगताना डॉ. इरफाना पाटील, त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात की, केस गाळण्याची असंख्य करणे आहेत. पण त्यामध्ये प्रामुख्याने Seasonal variation मुळे तर काही तीव्र आजाराने जसे की, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यु, मलेरिया, डायबिटीस आणि कॅन्सर यांसारख्या आजारामुळे देखील तुम्हाला केसगळतीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीरावर अतिरिक्त तणावामुळे तसेच सर्जरीमुळे देखील तुम्हाला केसगळतीचा सामना करावा लागतो. या समस्येला 'Acute Telogen Effluvium' असे म्हणतात.

हार्मोनल असंतुलन (Harmonal Imbalance) :

केसगळतीचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे. यात प्रामुख्याने कारण म्हणजे, गर्भधारणेनंतर (Post Pregnancy), शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस, जसे की, थायरॉईड, Hypothyroidism यामुळे देखील केसगळती होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, यामध्ये सर्वात प्रकर्षांने मुलींमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे, PCOS (Polycystic Ovary Syndrome), हार्मोनल असंतुलन (Harmonal Imbalance) यामुळे देखील अनेक महिलांना केसगळतीचा त्रास होतो. 

अपुऱ्या पोषणाचा अभाव (Nutritional Deficiency) :

हार्मोनल असंतुलनाच्या व्यतिरिक्त सध्याच्या काळात डायटिंग (Dieting) देखील खूप सामान्य गोष्ट झाली आहे. यामध्ये अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. या डाएटमधून केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. तसेच, केसांवर Hair Styling चा प्रभाव हेदेखील केसगळती होण्याचे महत्वाचे कारण आहे. Hair Styling साठी वारंवार केसांवर वापरण्यात येणारे केमिकल (Chemical), आयनिंग (Ironing), हेअर कलर (Hair Colour)  यामुळे मोठ्या प्रमाणात केसगळती होते. 

केस गळतीवर उपचार कोणते?

सर्वात आधी केस गळती नेमकी कशामुळे होते हे कारण शोधून काढणे. कारण सायकॉलॉजीकल केसगळती म्हणजेच गर्भधारणेनंतर, डेंग्यु, कोरोनानंतर जर केसगळती झाली तर ती 3 ते 4 महिन्यांनी थांबते. पण जर थायरॉईड, डायबिटीस, पीसीओडी, पीसीओएस किंवा न्यूट्रीशनच्या कमतरतेमुळे केसगळती होत असेल तर यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.   

केसगळती रोखण्यासाठीचे उपाय :

  • निरोगी आणि दाट केसांसाठी हेल्दी डाएट घेणं फार गरजेचं आहे. तसेच आपल्या आहारात प्रोटीन (Protein) आणि व्हिटॅमिन (Vitamin) बरोबरच Biotin, Zinc, Selenium, Iron युक्त पदार्थांचा  समावेश  करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर Omega-3 पॅटी अॅसिड पदार्थ  म्हणजेच ड्रायफ्रूट्सचा समावेश करणे गरजेचे आहे.
  • तसेच मांसाहारी डाएट करत असाल तर आहारात अंडी, मासे, मटण, चिकनचा समावेश करा.  
     
  • केसांवर जास्त प्रमाणात केमिकलचा वापर करणे टाळा.   

पाहा व्हिडीओ : 

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : मधुमेह हा आजार नेमका कसा होतो? काय आहेत लक्षणं आणि उपचार? वाचा तज्ज्ञांचं मत

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget