एक्स्प्लोर

Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीचा त्रास जास्त वाढतोय? केसगळती थांबविण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Hair Care Tips : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अधिक जाणवतो. विशेषत: मुलींमध्ये हा त्रास जास्त जाणवतो.

Hair Care Tips : बदलत्या ऋतूमानानुसार शरीरात अनेक बदल होतात. काही दिवसांतच याचे पडसाद चेहऱ्यावर, केसांवर, त्वचेवर दिसू लागतात. केस गळणे (Hair Fall) हीदेखील त्यातलीच एक समस्या आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अधिक जाणवतो. विशेषत: मुलींमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. केसांची निगा राखण्याची दिनचर्या बदलल्यामुळे, केस व्यवस्थित साफ न ​​केल्यामुळे किंवा कोंडा वाढल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात केसांकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. अशा परिस्थितीत काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवून केसांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. केसगळती थांबविण्यासाठी कोणते उपाय करावेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.   

केसगळती थांबविण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स :

गरम पाण्याने केस धुणे टाळा : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं तर अशक्यच आहे. त्यामुळे काही लोक गरम पाण्याने केस धुवतात. मात्र, असे न करता तुम्ही कोमट पाण्याने केस धुवा. तसेच, जास्त वेळ गरम शॉवरखाली उभे राहू नका. यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होते. 

केसांना तेल लावा : हिवाळ्यात केसांना हलक्या कोमट तेलाने मसाज करण्याची सवय लावा. यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा किंवा तुम्ही वापरत असेलल्या तेलाचा वापर करू शकता. तसेच केस धुवण्याच्या एक दिवस आधी किंवा 1-2 तास आधी तेल लावून छान मसाज करा. आणि नंतर केस धुवा. यामुळे केसांना गरम पाण्यापेक्षा कमी नुकसान होईल आणि केस धुतल्यानंतर केस पूर्वीपेक्षा निरोगी दिसतील. 

मास्क वापरा : निरोगी केसांसाठी आठवड्यातून एकदा केसांवर हेअर मास्क लावा. यामुळे केसांना प्रथिने आणि पोषक तत्व मिळतात. याशिवाय केसांची चिंता लक्षात घेऊन तुम्ही हेअर मास्क लावू शकता. अंडी, दही आणि मधाचा हेअर मास्क केसांसाठी चांगला आहे. कच्च्या दुधात मध मिसळून केसांना लावू शकता किंवा केस धुण्याच्या 15 मिनिटे आधी कोरफडीचे जेलदेखील तुम्ही लावू शकता. 

आवळ्याचा वापर करा : आवळ्याचा केसांसाठी देखील चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. हे केस गळतीला आतून प्रतिबंधित करते. हिवाळ्याच्या ऋतूत आवळा आरोग्यासाठीही उत्तम आहे. 

तूपाचे सेवन करा : हिवाळ्यात तुम्ही रोज तुपाचे सेवन करू शकता. याशिवाय केसांना तुपाने मसाज करा. ते लावण्यासाठी कापूस वापरा किंवा तुमच्या बोटांनी लावा. आयुर्वेदात केस गळणे थांबवण्यासाठी रात्री पायाला तूप लावणे देखील चांगले मानले जाते.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : महिलांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज वयानुसार बदलते; कशी ते जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुकDevendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Embed widget