Health Tips : दातदुखीपासून सुटका हवीय? 'या' 5 घरगुती उपायांचा वापर करा, 10 मिनिटांत फरक जाणवेल
Health Tips : दातदुखीचा त्रास अनेकदा कडक पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. तसेच, दातात बॅक्टेरिया, इन्फेक्शनमुळेही होऊ शकते.
Health Tips : दात दुखणे (Tooth Pain) ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होतो. ही समस्या जितकी छोटी वाटते तितकीच प्रत्यक्षात ती अधिक गंभीरदेखील आहे. दातदुखी ही समस्या किती गंभीर आहे हे केवळ तो त्रास सहन करणारी व्यक्तीच समजू शकते. दातदुखीचा त्रास असताना अनेकदा बोलणे, खाणे-पिणे सुद्धा कठीण होते. सामान्य भाषेत याला मोलर किंवा रूट पेन असेही म्हणतात. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की त्यामुळे तोंडदी सुजते. दातदुखी नेमकी का होते तसेच यावर घरगुती उपाय काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दातदुखीचा त्रास अनेकदा कडक पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. तसेच, दातात बॅक्टेरिया, इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. दाताच्या आत लगदा असतो, जो तंत्रिका ऊतक आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला असतो. हा लगदा असलेल्या या नसा तुमच्या शरीरातील सर्वात संवेदनशील असतात. जेव्हा या नसांना जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा त्यांना तीव्र वेदना होतात.
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा
मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने लगेच आरोम मिळतो. दिवसातून 4-5 वेळा ही प्रक्रिया केल्यास तुमचं दातदुखीचं दुखणं काही दिवसांतच दूर होईल.
बेकिंग सोडा पेस्ट
दातदुखीपासून आराम मिळविण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये फक्त बेकिंग सोडा घाला आणि दुखणाऱ्या दातांवर थेट लावा. यामुळे काही मिनिटांतच तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो.
बर्फ लावा
बर्फ कोणत्याही प्रकारची जळजळ बरी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. जर तुम्हाला दातदुखी असेल तर तुमच्या गालाच्या बाजूला बर्फाचा पॅक लावा. हे किमान 15 मिनिटे करा. तुम्हाला काही दिवसांत फरक दिसेल.
व्हॅनिला इसेन्स
जर तुम्हाला वाटले की व्हॅनिला फक्त शेक-केक किंवा आईस्क्रीममध्ये वापरला जातो, तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की या चवदार पदार्थात बरेच गुणधर्म आहेत. यामुळे दातदुखी बरी होण्यास खूप मदत होते. कापसाच्या बॉलवर फक्त व्हॅनिलाच्या रसाचे काही थेंब टाका आणि सुमारे 15 मिनिटे दुखणाऱ्या दातावर ठेवा. काही मिनिटे विश्रांती घ्या आणि तुम्हाला हळूहळू वेदना कमी झाल्यासारखे वाटेल.
लवंग
दातदुखीवर लवंग लावण्याचा सल्ला हा अनेक पिढ्यांपासून दिला जातो. दुखणाऱ्या दाताच्या अगदी वर संपूर्ण लवंग ठेवल्याने आराम मिळू शकतो. त्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Headache : डोकेदुखीवर आयुर्वेदिक उपचार, 'या' टिप्स नक्की वापरा
- Weight Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )