एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरवर लसूण रामबाण उपाय, हे फायदे तुम्हांला माहित आहेत?

Garlic Benefits Cholesterol : लसणाच्या वापराने जेवणाची चव वाढतेच पण त्यासोबतच लसणाचा अनेक रोगांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर केला जातो.

Garlic For High Blood Pressure : भारतात बहुतेक स्वयंपाकघरात लसूण वापरलं जातं. लसणाच्या ( Garlic ) वापरामुळे जेवणाची छान चव येते. पण लसणाचे याशिवायही अनेक फायदे आहेत. लसूण केस, त्वचा यांच्यासह अनेक रोगांवरही उपायोगी आहे. लसणाचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. लसणात अॅलिसिन नावाचं एक संयुग आढळतं, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलवर ( Cholesterol ) प्रभावी आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लसणामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. याशिवाय लसणाचे इतरही अनेक फायदे आहेत.

लसणाचे फायदे ( Benefits of Garlic )

1. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध प्रकारच्या समस्या जाणवतात. वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. या आजारांमध्ये लठ्ठपणा ( Obesity ) , मधुमेह ( Diabetes ) आणि उच्च रक्तदाब ( Blood Pressure ) यांसारखे आजारांचा समावेश आहे. तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी लसूण हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय आहे. दररोज सकाळी उठल्यावर कच्च्या लसूण आणि कच्ची लवंग चघळल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

2. हिवाळा सुरु झाला आहे. यावेळी शरीराती रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत होते. लसणात असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. यामुळे हृदय निरोगी राहते आणि ह्रदयासंबंधित आजार कमी होतात. यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अनेक प्रकारचे आजार आणि संक्रमणांपासून आपलं संरक्षण करतात.

3. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शरीरातील वाढत्या लठ्ठपणामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर हे घातक ठरू शकते. यादरम्यान, शिरांमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होईल आणि यामुळे तुमचं पचन सुधारेल.

लसणाचे जास्त सेवन हानिकारकही ठरू शकतं

लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण, लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त खाऊ नये, असा सल्लाही दिला जातो. ज्यांना सतत तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असेल, तर त्यांनीही लसूण खाणे टाळावं.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Embed widget