एक्स्प्लोर

Health Tips : दारू प्यायल्यानंतर 'या' गोष्टी कधीच खाऊ नका, नाहीतर शरीरात तयार होऊ शकते विष

हल्ली दारू पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, विशेषत: तरुणांमध्ये. बरेचदा लोक दारूबरोबरच काहीतरी खातात. पण दारू प्यायल्यानंतर काय खाऊ नये हे तुम्हाला माहीत आहे का?

Food To Avoid After Drinking : विशेषत: तरुणांमध्ये दारू (Alcohol) पिण्याचा कल सध्या खूप वाढला आहे. मद्यपान करणाऱ्यांसाठी फक्त एक निमित्त आवश्यक आहे, कारण आजकाल दारू पिणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार दारू प्यायला आवडते. घरातील पार्टी, बार, पब किंवा हॉटेलमध्ये दारूसोबत अनेक खाद्यपदार्थही दिले जातात आणि  लोकही ते खातात. पण तुम्हाला माहित आहे का की, असे काही खाद्यपदार्थ आहेत जे दारू पिल्यानंतर किंवा दारूसोबत खाऊ नयेत. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

काजू-शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते

अनेकदा लोकांना दारू पिताना शेंगदाणे किंवा काजू खाणे आवडते. पण तेआरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. दारू प्यायल्यावर  लगेच हे दोन्ही पदार्थ खाऊ नये. ते खाण्यास मनाई आहे कारण यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे.

सोडा किंवा थंड पेय शरीराकरता धोकादायक

जर तुम्ही सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्समध्ये मिसळून दारू प्यायली तर हे सर्व तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच  तुम्ही अल्कोहोलमध्ये केवळ  पाणी किंवा बर्फ मिसळून पिऊ शकता. 

मद्यपान करताना चिप्स किंवा कुरकुरीत पदार्थ खाऊ नका

दारू पिण्याच्या दरम्यान किंवा नंतर कुरकुरीत  पदार्थ किंवा चिप्स खाऊ नका. तसेच तळलेले मोमोज किंवा चिकन टाळा. कारण त्यामुळे तुमच्या पचनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

दारू पिल्यानंतर गोड खाऊ नका

मिठाईने नशा वाढते असे म्हणतात. अशा स्थितीत दारू पिल्यानंतर मिठाई न खाण्याचा प्रयत्न करावा. कारण दारूनंतर गोड अन्न हे विषासारखे आहे. 

मांसाहारी आणि मसालेदार जेवण खाऊ नये

दारूमुळे पोटात अॅसिडीटी होते. त्यामुळे पोटातल्या जळजळीपासून वाचण्यासाठी दारू पिताना किंवा त्यानंतर मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. बिर्यानी, कुर्मा भाजी असे पदार्थ खाणे टाळावे.

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा

दारू पीत असताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. दारू पिल्याने शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते. अशा वेळी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केले तर अपचनाचा त्रास होतो. म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळा.

Diclaimer : ही फक्त माहिती आहे, एबीपी माझा दारू पिण्याचं कोणतंही समर्थन करत नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या

CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात 86 कोटी 49 लाखांची मदत, वाचा कोणत्या महिन्यात किती रुग्णांना मदत?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget