Fitness Tips: वयाच्या 66 व्या वर्षीही आलियाची सासू दिसते 'फिट अन् सुंदर! रहस्य जाणून घ्यायचंय? फॉलो करा त्यांच्या 'या' फिटनेस टिप्स
Fitness Tips: ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर फिटनेसच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. वयाच्या 66 व्या वर्षीही त्या तितक्याच तरुण आणि सुंदर दिसतात.
Fitness Tips : वय वर्ष 66... या वयातही ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने आपला फिटनेस राखून आहेत. त्यांच्या या वयातही त्या तितक्याच तरुण आणि सुंदर दिसतात. नीतू कपूर फिटनेसच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. नीतू अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसाठी विविध टिप्स शेअर करत असतात. ज्यातून त्यांचा फिटनेस रुटीन आणि डाएट कळतो. जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं सीक्रेट....
नीतूच्या फिटनेस अन् सौंदर्याचे रहस्य!
वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी पडद्यावर अभिनयाला सुरुवात करणाऱ्या नीतू सिंग आता चित्रपटांनंतर सध्या छोट्या पडद्यावरही दिसतायत. ऋषी कपूर यांच्या पत्नी, अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट्टच्या सासूबाई नीतू कपूर त्यांची लेक रिद्धिमासोबत पिलेट्स किंवा योगा करताना दिसतात, याशिवाय त्या त्यांच्या आहाराचीही पूर्ण काळजी घेतात. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यामागील रहस्य चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्यांनी एक आरोग्यदायी रेसिपी दिली आहे. नीतू कपूरने प्रोबायोटिकशी संबंधित एक रेसिपी शेअर केली आहे. त्यानुसार आधी 1 चमचा शिजवलेला भात घ्यावा लागेल. मातीच्या भांड्यात पाणी आणि शिजवलेला भात मिक्स करून रात्रभर सोडा. तो शिजवलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचा. गाजर आणि बीटच्या पाण्यात थोडी फोडणी द्यायची, तुमची नाश्त्याची रेसिपी तयार आहे. नीतूने सांगितले की, गाजर आणि बीटचे गॅसवर उकळी काढलेले पाणी सर्वोत्तम प्रोबायोटिक आहे. कॅप्सूल घेण्यापेक्षा हे चांगले आहे. चीनमध्ये, लोक केसांच्या वाढीसाठी ही रेसिपी वापरतात.
नीतू कपूरचा डाएट प्लॅन
नीतू अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हेल्दी ब्रेकफास्टचे फोटो शेअर करत असतात. त्यांनी नाश्त्यात पोहे खायला आवडतात. ओट्स पोहे खाल्ल्याने अनेक पटींनी पोषण मिळते. नीतू कपूर यांना बहुतेक रोल केलेले ओट्स पोहे खायला आवडतात.
View this post on Instagram
नीतू दुपारच्या जेवणात काय खातात?
नीतू कपूर दुपारच्या जेवणात रोटी, डाळ, भाज्या आणि चिकन खातात. नीतूला जेवणादरम्यान बदाम खायला आवडते. सुका मेवा हा फायबरचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे ते खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि जेवणाचे प्रमाणही कमी होते. नीतूचे जेवण अगदी कमी तेलाने शिजवले जाते.
View this post on Instagram
हेही वाचा>>>
Fitness Tips: 'अॅनिमल' मधील भाभी 2 चं फिटनेस अन् सौंदर्याचं रहस्य माहित आहे? जेवणातून वगळली 'ही' एक गोष्ट, कशी बनवली सुपर हॉट फिगर?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )