एक्स्प्लोर

Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?

Nashik Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशावरून नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Nashik Politics : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्यात महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 15 जागांपैकी 14 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालाय. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत देखील नाशिकमध्ये महायुती वरचढ ठरेल, असे बोलले जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी करत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) मोठं इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. पक्ष प्रवेशावरून नाशिकमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. 

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सत्ता होती. भाजपचे सत्तरहून अधिक नगरसेवक नाशिक महापालिकेत होते. त्यामुळे महापालिकेचा कारभार करताना त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले होते. परंतु सध्या या नगरसेवकांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना शिंदे पक्षाने महापालिकेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र शिंदे गटाकडे नाशिकमध्ये मोजकेच माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे अन्य पक्षांतून नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने विशेष रणनीती आखली आहे. त्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी दररोज विविध पक्षांच्या नगरसेवकांना संपर्क करीत असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत निकालामुळे विरोधी पक्षांतील अनेक नगरसेवकांचे मनोबल घसरले आहे. या नगरसेवकांना विकास निधीचे आमिष दाखवून आपलेसे करण्यासाठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. 

भाजप-शिवसेनेत संघर्ष?  

यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे प्रभागात विकासकामांसाठी निधी देण्याचे प्रलोभन देऊन इतर पक्षातील माजी नगरसेवकांचे प्रवेश केले असल्याची तक्रार भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या मिटींगमध्येही शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. शिवसेनेत होणाऱ्या पक्ष प्रवेशाला भाजपाचा अप्रत्यक्षपणे विरोध असल्याचे पाहायला मिळत असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Adani Stocks : हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालं, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
हिंडेनबर्ग रिसर्च बंदची घोषणा, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Embed widget