सकाळी 8.37 बॉसला सिक लिवचा मेसेज केला अन् 10 मिनिटांत हार्ट अटॅकने मृत्यू, बॉसही हादरला, नेमकं घडलं काय?
हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी पहिल्या १ ते १.५ तासांत वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर लक्षणे ओळखणे, ताण कमी करणे हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे

Sudden Cardiac Arrest Delhi: मृत्यू कधी आणि कोणत्या रूपात येईल, हे सांगता येत नाही. याचे एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आले आहे. 40 वर्षांच्या एका कर्मचाऱ्याने पाठदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत सुट्टीसाठी मेसेज केला . बॉसनेही 'ठीक आहे, विश्रांती घ्या” असा रिप्लाय केला. पण अवघ्या 10 मिनिटांत, सकाळी कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक आला . आणि जागेवर त्याचा जीव गेला . 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे या 40 वर्षीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबासहित ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना धक्का बसलाय .
8.37 ला 'सिक लिव ' चा मेसेज, 8.47 ला हार्ट अटॅक
13 सप्टेंबर रोजी ही घटना घडलीय. 40 वर्षांच्या शंकरला सकाळी पाठदुखीचा त्रास झाला . त्यामुळे सकाळी 8.37 ला त्याने बॉसला सुट्टीसाठी मेसेज केला . बॉसनेही "ओके . आराम कर " असा मेसेज केला. पण अवघ्या 10 मिनिटात शंकरला कार्डिॲक अरेस्ट आला अन् त्याचा मृत्यू झाला . या घटनेची माहिती बॉस अय्यर यांना सकाळी 11 वाजता फोनद्वारे मिळाली. सुरुवातीला त्यांनी हे खरे नसावे म्हणत विश्वास ठेवला नाही आणि दुसऱ्या सहकाऱ्याशी संपर्क साधून शंकरचा पत्ता मिळविला, नंतर ताबडतोब घरी धाव घेतली,तेव्हा त्यांची मृत्यूची सत्यता उघड झाली. अय्यर यांनी X वर या दुर्दैवी घटनेबाबत लिहिले की, “सकाळी ८.३७ वाजता शंकर यांनी सुट्टीसाठी मेसेज केला आणि मी उत्तर दिलं. ११ वाजता मला फोन आला की शंकर गेले आहेत. सुरुवातीला विश्वास बसला नाही. दुसऱ्या सहकाऱ्याला विचारलं, पत्ता मिळवला, घरी धाव घेतली, पण ते तिथे नव्हते.”
DEVASTATING INCIDENT WHICH HAPPENED TODAY MORNING :-
— KV Iyyer - BHARAT 🇮🇳🇮🇱 (@BanCheneProduct) September 13, 2025
One of my colleague, Shankar texted me today morning at 8.37 am with a message
"Sir, due to heavy backpain I am unable to come today. So please grant me leave." Such type of leave requests, being usual, I replied "Ok take…
या घटनेने सोशल मीडियावर हृदयविकाराच्या लक्षणांविषयी चर्चेला तुफान गती दिली आहे. वापरकर्त्यांनी सांगितले की, पाठदुखी, थकवा, घाम येणे, उलट्या किंवा खांद्यापर्यंत वेदना—अशा हलक्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेकांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले की, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मित्र किंवा कुटुंबीय अकाली गेले.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी पहिल्या १ ते १.५ तासांत वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर लक्षणे ओळखणे, ताण कमी करणे आणि शरीराचे योग्य सांभाळ करणे हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.शंकरच्या अकाली मृत्यूने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, जीवन अनपेक्षित आहे. आपण कितीही निरोगी असलो तरी, अचानक येणाऱ्या आपत्तींपासून कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण काळजीपूर्वक जगणे आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























