Tea Biscuit Breakfast: चहासोबत बिस्कीट खाताय? मग आजपासून करा बंद, शरीरावर होईल असा परिणाम
Healthy Breakfast: अनेकजण सकाळी नाश्तामध्ये चहा-बिस्किट खाण्याची सवय असते.मात्र, ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Tea Biscuit Breakfast: सकाळची सुरुवात दुधाचा चहा आणि बिस्किटांनी करणारे अनेक जण आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा विविध वयोगटात चहा-बिस्कीटचा नाश्ता (Tea Biscuit Breakfast) हा आवडीचा नाश्ता आहे. रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा बिस्किटे खाणे चांगले, त्यामुळे आम्लपित्त होणार नाही असे मानणारे काहीजण आहेत. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यामुळे फक्त सकस आहारावर (Healthy Food) भर द्यायला हवा. सकस आहार घेतल्यास मधुमेह, बीपीसारखे आजार होणार नाहीत, असे तज्ज्ञ म्हणतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे एकत्र कधीही खाऊ नयेत. बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्स वापरतात. त्यामुळे वजन आणि लठ्ठपणा दोन्ही वाढू लागतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ चहा आणि बिस्किट एकत्र खाण्याचा सल्ला देत नाहीत. चहा-बिस्कीट खाल्ल्याने काही क्षणांसाठी आपल्याला काही खाल्ल्याचा आनंद वाटू शकतो. मात्र, आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो.
सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. चहा-बिस्किट हे कॉम्बिनेशन देखील या समस्येचे मुख्य कारण आहे. बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या रिफाइंड साखरमध्ये कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्याला कोणतीही हानी होत नाही आणि त्वचाही चमकदार होते.
वजन वाढण्याचे कारण
बिस्किटामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय, हायड्रोजनेटेड फॅट्स असते. साध्या बिस्किटात 40 टक्के कॅलरीज असतात. तर क्रीम किंवा ताजे बेक केलेल्या बिस्किटांमध्ये 100-150 कॅलरीज असतात. ज्यांना बिस्किट खाण्याची सवय आहे, त्यांनी काळजी घ्यावी. बिस्किट खाल्ल्याने वजन वाढते ही बाब लक्षात घ्यावी असेही आहार तज्ज्ञ म्हणतात.
दातांवर वाईट परिणाम
चहा-बिस्किट एकत्र खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात. चहा-बिस्किटमध्ये आढळणाऱ्या सुक्रोन्झमुळे दात किडतात. चहा बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांचे अनेक आजार होऊ शकतात. त्याच्या परिणामी दात पडणे, दात किडणे, दाढ दुखणे, काळे डाग पडणे, दाढेमध्ये खड्डा पडणे आदी समस्याही चहा-बिस्किटांमुळे होऊ शकतात.
( Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. आरोग्य विषयक सल्ला, उपचार हा आपले डॉक्टर, आहार तज्ज्ञ आदींच्या सल्ल्यांनुसार करावे. )
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )