एक्स्प्लोर

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

BMC Sarita Mhaske : एक नगरसेवक फुटल्याने ठाकरे गटाची संख्या 64 वर येण्याची शक्यता आहे. फुटलेल्या नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. 

मुंबई : एकीकडे कल्याण डोंबिवलीतील चार नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर लगेच साथ सोडल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का बसला आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के शिंदे (Sarita Mhaske) यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची माहिती आहे. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. सेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.

मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्या. तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले. त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने सस्पेन्स वाढला. 

अपात्र करण्यासाठी हालचाली सुरू

सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू झाली आहे. सरिता म्हस्के जर शिंदेंसोबत गेल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही 64 वर येईल.

किशोरी पेडणेकर गटनेतेपदी

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत किशोरी पेडणेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कल्याणमध्ये ठाकरेंचे चार नगरसेवक फुटले

कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी चार नगरसेवक फुटले असून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. उर्वरित सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही सगळे एकत्र आहोत ,आम्हाला सत्ता स्थापनेसाठी फोन येतात मात्र वरिष्ठांच्या भूमिकेनंतरच निर्णय घेणार असं त्या नगरसेवकांनी म्हटलंय. तसेच आम्ही महाालिकेत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असंही त्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. शिंदे आणि मनसेची साथ देणाऱ्या 4 नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा ठाकरेंकडून देण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Maharashtra ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
Embed widget