KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report
राजकीय शोलेच्या सुरूवातीला दिवसभरातली सर्वात मोठी आणि चर्चेतली बातमी... कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि एकच खळबळ उडाली... मात्र मनसेच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत... ज्या कल्याण-डोंबिवलीकरांनी मनसेचे नगरसेवक जिंकावेत म्हणून मतं दिली, त्या मतदारांचा मनसेनं विश्वासघात केला? ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशीही प्रतारणा झालीय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून मनसेनं अप्रत्यक्षरित्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठितही खंजीर खुपसलाय का ? या सगळ्या प्रश्नाची कल्याण डोंबिवलीकरांना उत्तरं हवी आहेत.. राज ठाकरे ही उत्तर देतील का?
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी मनसेची अवस्था झालीय का? असा प्रश्न उपस्थित केला जाणारच
कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे कुणाचं कल्याण होईल हे महापौरपदाचा निर्णय़ झाल्यानंतर समजेलच
मात्र मनसेच्या विश्वासार्हतेचं नुकसान झालंय एवढं नक्की...
विनायक पाटीलसह सुरेश काटे एबीपी माझा कल्याण-डोंबिवली
All Shows































