Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
Bad Wine : वाईन खराब होत नाही असा अनेकांचा समज आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर वाईनच्या चवीवर परिणाम होतो.
Wine : मद्यसेवन करणाऱ्यांमधून सर्वसामान्यपणे विचारला जाणार प्रश्न म्हणजे वाईन खराब होते का? वाईनची बाटली एकदा उघडल्यानंतर ती किती दिवसात प्यायला हवी? ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर वाईन किती दिवस टिकते? ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर वाईन खराब होऊ शकते. त्याला मर्यादित शेल्फ लाइफ असल्याने ती काही दिवसातच प्यायला हवी.
वाईनला मर्यादित शेल्फ लाइफ आहे. बाटली उघडल्यानंतर वाईन ही ऑक्सिजनच्या संपर्कात येते. त्या ठिकाणीऑक्सिडेशन झाल्यामुळे वाइनची चव सहजपणे बदलू शकते. त्यामधील ॲसिडिक अॅसिडची पातळी वाढते आणि त्याची चव बदलते. त्यावेळी वाइनची चव ही व्हिनेगरमध्ये बदलू शकते. तुमची आवडती वाइन शिळी होऊ शकते आणि व्हिनेगरचा वास येऊ शकतो. त्यामुळे एकदा वाइनच्या बाटलीचे टोपन उघडले तर पुढील पाच ते सहा दिवसात ती प्यायला हवी.
अनेकदा विकेंड डिनर पार्टीमध्ये आकर्षक वाईनची सोय केलेली असते. पण वाईनची बाटली संपली नसल्याने ती तशीच ठेवली जाते. मात्र ती फार काळ चांगली राहू शकत नाही.
वाईनची शेल्फ लाइफ म्हणजे काय?
वाईन तज्ञ म्हणतात की वाइनचे शेल्फ लाइफ असते. वाईन ही ऑक्सिजनच्या संपर्कात आली तर त्याचे रुपांतर हळूहळू व्हिनेगारमध्ये होते, त्याची चव बदलते. त्यामुळे ती खराब होते. अशा वाईनला बॅड वाईन म्हटलं जातं.
ऑक्सिडेशन प्रक्रियेपासून वाईनचे संरक्षण करण्यासाठी अनेक वाईनमेकर ॲसिडिटी प्रिझर्वेटिव्ह्ज वापरतात. त्यामुळे कमी आंबटपणा असलेली वाईन अधिक लवकर व्हिनेगरमध्ये रुपांतरित होते. वाईनची बाटली उघडल्यास बॅक्टेरिया त्याच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे वाइन खराब होऊ शकते. त्याची चव बदलू शकते आणि ती चिकट होऊ शकते.
वाईन पाच ते सहा दिवसांपर्यंत टिकते
साधारणपणे, रेड वाईन, व्हाईट वाईन किंवा रोझ वाईनची उघडलेली बाटली किती काळ टिकते हे तिच्यात असलेल्या आंबटपणावर किंवा ती कशी साठवली गेली यावर अवलंबून असते. साधारणपणे तीन ते पाच दिवस वाइन पिण्यायोग्य राहते.
स्पार्कलिंग वाइन देखील लवकर खराब होते आणि ते उघडल्यानंतर फक्त एक ते तीन दिवस ठेवता येते. स्पार्कलिंग वाईन जितकी जास्त वेळ उघडी राहते, तितक्याच वेगाने ते कार्बोनेशन गमावते.
How Long Opened Wine Lasts : कोणती वाईन किती दिवसात प्यावी?
- स्पार्कलिंग Sparkline Wine - 1 ते 2 दिवस
- लाईट व्हाईट अँड रोज वाईन Light White And Rose Wine- 4 ते 5 दिवस
- रिच व्हाईट Rich White Wine - 3 ते 5 दिवस
- रेड वाईन Red Wine - 3 ते 6 दिवस
- डेजर्ट वाईन Dessert Wine - 3 ते 7 दिवस
- पोर्ट वाईन Port Wine - 1 ते 3 आठवडा
- शेरी वाईन Sherry Wine- 1 ते 8 आठवडा
(Disclaimer : मद्य, अल्कोहोल प्राशन करणे हे आरोग्यास हानीकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )