Diet soda sweetener : 'हा' पदार्थ ठरु शकतो कर्करोगासाठी आमंत्रण? कर्करोगजन्य गोष्टींच्या यादीमध्ये समावेश करण्याची शक्यता
Diet soda sweetener : खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमध्ये अस्पार्टम या कृत्रिम गोड पदार्थाचा समावेश करण्यात येतो. परंतु हा पदार्थ कर्करोगजन्य असल्याचं आता म्हटलं जात आहे.
Diet soda sweetener : खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्या 'अस्पार्टम' (Aspartame) या कृत्रिम गोड पदार्थाचा समावेश कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) लवकरच या संदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. वृत्तानुसार, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरकडून (IARC) जुलै महिन्यामध्ये 'अस्पार्टम' या पदार्थाचा समावेश कर्करोगजन्य पदार्थांच्या यादीमध्ये करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला यावर अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. यावर आधारित सर्व चाचण्यांची पडताळणी झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यामध्ये जवळपास 1,300 संशोधनांचे विश्लेषण करण्यात आले आहे. परंतु IARC वेगवेगळ्या पदार्थांबाबत मूल्यांकन केले आहे. त्यानंतर त्यांनी उत्पादकांना त्यांच्या पदार्थांमध्ये अनेक बदल करण्याचे देखील निर्देश दिले होते. त्यामुळे IARC चे मूल्यांकन लोकांसाठी गोंधळात टाकणारे असू शकते असं देखील म्हटलं जात आहे. तर जेईसीएफए (जॉइंट डब्ल्यूएचओ आणि फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची एक्सपर्ट कमिटी ऑन फूड अॅडिटीव्ह) आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील या पदार्थावर विश्लेषण करण्यात आले आहे. तर जून महिन्याच्या अखेरीस या संस्थांची या संदर्भात बैठक देखील घेण्यात आली आहे.
दरम्यान IARC च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, IARC आणि JECFA दोन्ही समित्यांचे निष्कर्ष जुलैपर्यंत गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्वीटनर्स असोसिएशन (ISA) चे सरचिटणीस फ्रान्सिस हंट-वुड म्हणाले की, 'IARC ही अन्न सुरक्षा संस्था नाही, त्यामुळे त्यांच्या संशोनवार विश्वास ठेवणे कठिण आहे' पंरतु IARC ने केलेल्या सुरुवातीच्या संशोधनामध्ये अस्पार्टम या पदार्थामुळे कर्करोगाची शक्यता असते हे सिद्ध होऊ शकले नाही.
त्यामुळे ज्या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमध्ये सेवन करणे हे अस्पार्टम या पदार्थाचा समावेश असतो त्यांचे सेवन करणे धोकायदायक ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सध्या या पदार्थावरुन अनेक संभ्रम असून आता जागतिक आरोग्य संघटना यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आपण या पदार्थांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देखील यावेळी तज्ञांकडून देण्यात येत आहे. परंतु यावर आता जागतिक आरोग्य संघटना काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
Food Poisoning : पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )