एक्स्प्लोर

Diabetes Insulin : इन्सुलिनचा साठा आणि पुरवठा साखळीतील गुंतागुंतीचे व्यवस्थापन, आव्हाने आणि उपाय कोणते? जाणून घ्या सविस्तर

Diabetes Insulin : मधुमेह असलेल्या लाखो लोकांसाठी, इन्सुलिन हे केवळ एक औषध नाही तर दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे.

Diabetes Insulin : मधुमेह असलेल्या लाखो लोकांसाठी, इन्सुलिन हे केवळ एक औषध नाही तर दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी या जीवनदायिनी हॉर्मोनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यावर अवलंबून राहावे लागणाऱ्यांच्या दृष्टीने त्याची उपलब्धता आणि कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. एकट्या भारतात जवळपास 74 दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत आणि त्यामध्ये इन्सुलिन उपचाराची गरज असलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. ही मागणी वाढत असली तरी उत्पादनापासून रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा इन्सुलिनचा प्रवास म्हणजे एक नाजूक पुरवठा साखळी आहे. त्यासाठी अचूक तापमान व्यवस्थापन आवश्यक आहे. ज्यांना याच्या सातत्यपूर्ण प्रभावावर अवलंबून राहावे लागते. त्यांच्यासाठी कोणतीही चूक थेट जीवनावर परिणाम करू शकते.

इन्सुलिन पुरवठा साखळीतील गुंतागुंत समजून घेणे म्हणजे प्रत्येक टप्प्यावर असलेल्या आव्हानांचे आणि संपूर्ण साखळीमध्ये काटेकोरपणे तापमान नियंत्रण राखण्याचे महत्त्व समजून घेणे आहे. गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप, अप्लायन्सेस डिव्हिजनमधील हेल्थकेअर अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड जयशंकर नटराजन यांनी या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकला आणि इन्सुलिन पुरवठा साखळी, यामध्ये असलेली जोखीम आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत माहिती दिली.

इन्सुलिनची वाहतूक आणि पुरवठा साखळीत येणारी आव्हाने

उत्पादन : इन्सुलिनचा प्रवास औषधनिर्मिती सुविधा केंद्रापासून सुरू होतो. तिथे इन्सुलिनची क्षमता सुनिश्चित करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून त्याचे उत्पादन केले जाते.

वितरण केंद्रात साठवण : एकदा उत्पादन झाल्यानंतर, इन्सुलिन वितरण केंद्रात नेले जाते. इन्सुलिनची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेले 2°-8°C तापमान राखणाऱ्या प्रगत रेफ्रिजरेशन प्रणालीने ही केंद्र सुसज्ज असतात. पुढील वाहतुकीसाठी तयार असेपर्यंत कोल्ड चेन अखंड राहावी हे सुनिश्चित करण्यासाठी तापमान मॉनिटरिंग उपकरणे वापरली जातात. 

तापमान-नियंत्रित वाहतूक : त्यानंतर इन्सुलिन आवश्यक तापमान राखण्यासाठी डिझाइन केलेल्या विशेष इन्सुलेटेड कंटेनर्सच्या माध्यमातून त्याच्या अंतिम ठिकाणी म्हणजेच फार्मसीज, रुग्णालये आणि इतर आरोग्यसेवा केंद्रांमध्ये पोहचवले जाते.

वाहतुकीदरम्यान रिअल-टाइम मॉनिटरिंग : गुणवत्ता राखण्यासाठी प्रवासादरम्यान सतत परिस्थितीवर देखरेख  करण्यासाठी तापमान डेटा लॉगर्सचा वापर केला जातो. यामुळे रिअल-टाइम मॉनिटरिंग शक्य होते. त्यायोगे  आदर्श तापमान श्रेणीपासून झालेला कोणताही बदल त्वरित ओळखता येऊ शकतो आणि इन्सुलिनची गुणवत्ता बिघडणार नाही हे सुनिश्चित केले जाते.

अंतिम वापरकर्त्यांपर्यंत वितरण : इन्सुलिनच्या प्रवासाचा अंतिम टप्पा अनेकदा सर्वात असुरक्षित असतो, कारण वैयक्तिक रुग्ण किंवा स्थानिक आरोग्य सुविधांना पुरवठा करताना पुरेसे तापमान नियंत्रण नसू शकते. अनेक वेळा इन्सुलिनला आईसपॅकसह विकले जाते, जे योग्य तापमान राखत नाही. ग्रामीण भागात किंवा तीव्र हवामानात राहणाऱ्या रुग्णांसाठी इन्सुलिन सुरक्षित तापमानात ठेवणे हे एक अतिरिक्त आव्हान ठरू शकते.

रुग्णाच्या पातळीवर इन्सुलिन साठवणूक : विश्वसनीय उपायांची गरज

इन्सुलिन एकदा रुग्णांपर्यंत पोहोचल्यानंतर साठवणुकीची जबाबदारी त्यांच्यावर येते. इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी 2° ते 8°C या शिफारस केलेल्या तापमानात साठवण करणे अत्यावश्यक आहे. तथापि, अनेक रुग्ण अयोग्य साठवणुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. 

घरगुती फ्रिज : अनेक रुग्ण इन्सुलिन घरगुती फ्रिजमध्ये ठेवतात. तथापि, दरवाजा वारंवार उघडणे व परिणामी तापमानात होणारे चढउतार इन्सुलिनच्या कार्यक्षमतेसाठी धोका निर्माण करतात.

आईस पॅक : प्रवासादरम्यान आईस पॅकचा वापर केला जातो, परंतु त्यामुळे इन्सुलिन गोठू शकते आणि त्याची कार्यक्षमता कमी होते.

पर्यायी पद्धती : ग्रामीण भागात काहीजण इन्सुलिन थंड ठेवण्यासाठी मातीचे मडके, थंड करणारे माठ किंवा ओले कपडे गुंडाळणे यांसारख्या पद्धतींवर अवलंबून असतात.

परंतु या पद्धती इन्सुलिनला आवश्यक असलेली अचूक तापमान श्रेणी विश्वासार्हपणे राखत नाहीत. दुर्लक्ष किंवा अज्ञानामुळे अनेक वेळा लोक इन्सुलिनला सर्वसाधारण तापमानात किंवा पर्स व बॅगमध्ये ठेवतात. अचूक तापमानात सातत्याने थंड नसल्यास, इन्सुलिनची कमाल क्षमता आणि प्रभावीपणा कमी होऊ शकतो.  यामुळे मधुमेह व्यवस्थापनाला धक्का पोहोचतो आणि कालांतराने इन्सुलिन डोस वाढण्याची आवश्यकता निर्माण होते.

इन्सुलिन वापरकर्त्यांसाठी योग्य इन्सुलिन साठवणुकीसाठी टिपा 

इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेह रुग्णांसाठी त्याचा प्रभावीपणा सुनिश्चित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत:

आदर्श तापमान राखा : उघडलेल्या इन्सुलिनच्या कुप्या सर्वसाधारण तापमानात २८ दिवस चांगल्या असतात, तर न उघडलेल्या कुप्यांना कमाल प्रभावासाठी २°-८°C दरम्यान साठवावे लागते. प्रवासादरम्यान तापमानातील बदल हाताळणे कठीण असू शकते. अशा वेळी या तापमानाचे विशेषतः पालन करणे आवश्यक आहे. 

सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवा : नेहमी इन्सुलिन थेट सूर्यप्रकाशापासून आणि उच्च तापमानापासून दूर ठेवा, कारण यामुळे इन्सुलिन जलद खराब होऊ शकते.

इन्सुलिन साठवणुकीच्या विशिष्ट उपायांचा विचार करा : गोदरेज इन्सुलीकूलसारखे खास उपकरण, आदर्श तापमान श्रेणीत सातत्याने थंडपणा राखण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही उपकरणे खास इन्सुलिनसाठी बनवली आहेत. घरगुती फ्रिजच्या तापमानात अनेकदा चढउतार होत असतात. या उपकरणाने ते टाळले जाते. तसेच प्रवासामध्ये  ही उपकरणे एक उत्तम पोर्टेबल उपाय ठरतात. ही उपकरणे आंतरिक तापमान सतत दर्शवतात, त्यामुळे त्याची कार्यक्षमता तपासता येते. महत्वपूर्ण नियमाप्रमाणे, इन्सुलिनसाठी कोणतेही साठवणुकीचे साधन खरेदी करण्यापूर्वी, ते कोणती तापमान श्रेणी राखण्याचे आश्वासन देते याची खात्री करून घ्या.

पुढील दिशा

जगभरात इन्सुलिनची मागणी वाढत असताना, कार्यक्षम पुरवठा साखळीचे महत्त्व बाजूला सारले जाऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीदरम्यान तापमान मॉनिटरिंग सुधारणे, रिटेल काउंटरवर व्यवस्थित तापमान राखणारी योग्य घरगुती साठवण उपाय पुरविणे आणि प्रवासास अनुकूल तापमान राखणारी साठवण सुविधा उपलब्ध करणे ही सर्व महत्त्वपूर्ण पावले आहेत. या जीवनदायिनी औषधाची कार्यक्षमता आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठीचे हे आवश्यक उपाय आहेत. इन्सुलिन वितरणासाठी एक शाश्वत परिसंस्था तयार करण्याकरता पुरवठा साखळीतील दक्षता आणि रुग्ण शिक्षण यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. 

आणखी वाचा 

Women Health: काय सांगता! उशीरा गर्भधारणेमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? सुरुवातीची लक्षणे कोणती? कसा वाढतो धोका? तज्ज्ञ काय म्हणतात?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget