एक्स्प्लोर

Heart Attack : भारतीयांनो हृदय सांभाळा! हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ

Heart Attack : भारतीयांच्या आरोग्याबाबत काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 12.5 टक्क्यांनी वाढली आहे.

Heart Attack :  मागील काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) वयस्करांसह तरुणांचा मृत्यू होत असल्याच्या घटना अनेकांच्या आजूबाजूला घडल्या असतील. भारतीयांच्या आरोग्याबाबत काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 12.5 टक्क्यांनी वाढली आहे. 
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

वर्ष 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 12.5 टक्क्यांनी वाढली आहे. अहवालानुसार,  2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने 32,457 लोकांचा मृत्यू झाला.  ही आकडेवारी त्याच्या गेल्या वर्षी नोंदलेल्या 28,413 मृत्यूंपेक्षा कितीतरी जास्त आहे. 

कोविड-19 पासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे हृदयावरही परिणाम होत असल्याचा दावा काही संशोधनातून करण्यात आला होता. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. 2022 मध्ये एकूण अचानक मृत्यूची संख्या खूपच आश्चर्यकारक आहे. आकडेवारी 56,450 आहे, जी गेल्या तीन वर्षांत चिंताजनक वाढणारी प्रवृत्ती दर्शवते.

गेल्या तीन वर्षांत आकडेवारीत वाढ

हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावणाऱ्यांच्या संख्येत मागील तीन वर्षात मोठी वाढ झाली आहे. 2022 मध्ये हा आकडा 56,450 वर पोहोचला. त्याच्या गेल्या वर्षीच्या 50,739 च्या आकड्यापेक्षा 10.1 टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे.  'एनसीआरबी'ने आपल्या अहवालात आकस्मिक मृत्यूची व्याख्या केली आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा आकडा 2020 मध्ये 28,579 इतका होता. त्यात 2021 मध्ये 28,413 पर्यंत कमी झाला आणि नंतर 2022 मध्ये पुन्हा 32,457 पर्यंत इतका वाढला.

यामुळे हृदयविकाराचा झटका येतो

तज्ज्ञांनी हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या अनेक घटकांकडे लक्ष वेधले आहे. सोडियमचे अधिक प्रमाण असलेला आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अति मद्यपान, खूप सक्रिय नसणे आदी कारणांनी हृदयविकाराला आमंत्रण मिळते.  आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च हिमोग्लोबिन पातळी देखील तुमच्या हृदयाचा धोका वाढवू शकते. स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्या, ज्याला पॉलीसिथेमिया म्हणतात. 

अस्थिमज्जामधील विकृतींमुळे मानवी शरीरात लाल पेशींचे प्रमाण वाढते. या अतिरिक्त पेशी रक्त घट्ट करतात. त्याचा प्रवाह कमी होतो आणि रक्ताच्या गुठळ्या सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. 'नॅशनल हेराल्ड' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे प्रधान संचालक डॉ. राहुल भार्गव यांनी सांगितले की, हिमोग्लोबिनच्या उच्च पातळीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. यामुळे रक्त गोठण्याचा धोका वाढू शकतो आणि काहीवेळा धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget