(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cucumber: गॅस आणि अपचनानं त्रस्त आहात? आहारात करा काकडीचा समावेश
बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस या समस्या ज्या लोकांना जाणवतात ते लोक आहारात काकडीचा (Cucumber) समावेश करु शकतात.
Cucumber: अनेक लोक सॅलड खातात. सलाडमध्ये काकडीचा (Cucumber) समावेश केला जातो. तसेच काकडीची कोशिंबीर देखील अनेकांना आवडते. उन्हाळ्याबरोबरच हिवाळ्यात देखील तुम्ही काकडी खाऊ शकता. अनेकांना अपचन आणि गॅस सारख्या समस्या जाणवतात. बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस या समस्या ज्या लोकांना जाणवतात ते लोक आहारात काकडीचा समावेश करु शकतात. जाणून घेऊयात काकाडी खाण्याचे फायदे-
काकडीच्या आतील बियांमुळे बद्धकोष्ठता, अपचन दूर होते. तसेच काकडीत मुबलक प्रमाणात पाणी असते ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यात काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडी ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे पॉवरहाऊस आहे. काकडी सॅलड, सँडविच किंवा रायतामध्ये खाऊ शकता. काकडी रात्रीचं सेवन केल्यानं तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. याशिवाय काकडी सकाळी किंवा दिवसा कोशिंबीर किंवा रायत्यामध्ये घालून खाऊ शकता. दुपारच्या जेवणात काकडी नक्की खा.
काकडीत खूप कमी कॅलरीज असतात. एका काकडीमध्ये 15-17 कॅलरीज असतात. हिवाळ्यात रात्री काकडी खाणे टाळावे. कारण काकडीचा कूलिंग इफेक्ट असतो ज्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते.
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, जे रक्तातील साखर कमी करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात काकडीचा समावेश करणे आवश्यक आहे.
रोज काकडीचा प्यायल्यानं तुमची पचन क्रिया सुधारेल काकडीचा ज्यूस तयार करण्यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचं साल काढा. काकडी चिरून घ्या. चिरलेली काकडी एका पाणी असलेल्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा जारमध्ये ठेवा. त्यापाण्यामध्ये लिंबू पिळा. हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन ते प्या.
तुम्हाला मधुमेहापासून लवकर आराम मिळवायचा असेल तर त्यासाठी रोज काकडीचे सूप प्या. काकडीचे सूप बनवण्यासाठी फक्त एक काकडी पुरेशी आहे. यासाठी प्रथम काकडी कापून घ्या. नंतर 3 चमचे लिंबाचा रस, 1 छोटा कांदा, 1 लसूण पाकळी, 1/2 कप धणे, एक टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. आता हे सर्व मिक्समधून मिक्स करुन घ्या. आता हे मिश्रण एका भांड्यात काढा. आता हे ताजे-ताजे सूप सेवन करा. यामुळे वजन देखील कमी होते.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे आम्ही फक्त सूचना आणि माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )