Corona Virus Update : थंडीमुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वेगाने वाढतो? कोरोना झाल्यास उपचार काय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Corona Virus Update : संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट पसरत असताना वाढत्या थंडीमुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वेगाने वाढतो का असा अनेकांमध्ये संभ्रम आहे.
Corona Virus Update : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. सर्वसाधारणत: थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे या काळात कोरोनाचाही संसर्ग होऊ शकतो अशी एकंदरीत भीती पसरली आहे. परंतु, फक्त वाढत्या थंडीमुळे किंवा वातावरण बदलामुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत नाही. तर, यामागे इतरही अनेक कारणं आहेत. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट पसरत असताना वाढत्या थंडीमुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वेगाने वाढतो का? आतापर्यंतच्या कोरोना व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अति गंभीर आहे का? कोरोनाची लागण झाल्यास यावर उपचार नेमके कोणते घ्यायचे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर, या संदर्भात, डॉ. एच. बी. प्रसाद (औषधशास्त्र विभाग प्रमुख, सोलापूर) यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सध्याच्या वातावरणात कोरोना संदर्भात काय काळजी घ्याल?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे प्रत्येकाने श्वासोच्छवासाबद्दल काळजी घेणे खूप गरजेचं आहे. यामध्ये उबदार कपडे घालणे, थंडीपासून संरक्षण करणे तसेच या काळात शक्यतो धूळग्रस्त जी ठिकाणं आहेत किंवा जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. अशी काळजी आपण घ्यावी.
सध्याची कोरोनाची लक्षणं काय?
आतापर्यंत कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या आहेत. तसेच, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर कोरोनाच्या स्टेटेजप्रमाणे सीव्हिरीटी (तीव्रता) असते. सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणं जाणवतात. ही सौम्य लक्षणं एका आठवड्यात बरी होतात. मात्र, यापुढेही पेशन्ट्सना किडनीत इन्फेक्शन होऊ शकते. फुफ्फुसात इन्फेक्शन होऊ शकते, न्यूमोनिया होऊ शकतो. आणि आजाराचं गांभीर्य हळूहळू वाढत जातं. जे काही कोरोना विषाणूमध्ये बदल होतायत त्याच्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा व्हेरिएंट बदलत चालला आहे.मात्र, सध्याचा जो कोरोना आहे त्याचे तीव्र लक्षणं जाणवणार नाही. परंतु, प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि ज्या रूग्णांना श्वसानाशी संबंधित कोणतेही लक्षणं दिसतील त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कोरोना झाल्यास उपाय काय?
कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये फारसा बदल झालेला नाही. तुमची लक्षणं किती तीव्र आहेत यावरून उपचार केले जातात. मात्र, जर तुम्हाला न्यूमोनिाया झाला असेल, ऑक्सिजन लेव्हल कमी असेल किंवा श्वास घ्यायला जास्त त्रास होत असेल तर यावर वेळीच दवाखान्यात उपचार केले जातात.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )