एक्स्प्लोर

Health Tips: लहान वयात कॅन्सर होण्याचं प्रमाण कशामुळे वाढलं? 'या' 6 सवयी ठरतायत मोठं कारण

Cancer In Early Age: नुकतंच कॅन्सरबाबत एक संशोधन समोर आलं आहे, ज्यात 50 वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं समजलं. आता या मागची नेमकी कारणं काय? हे समजून घेऊयात...

Health Tips: सध्याच्या युगात लहान वयातच कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच कर्करोगाबाबत (Cancer) एक संशोधन समोर आलं आहे. या 30 वर्षांत संपूर्ण जगातील 50 वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास 79 टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं संशोधनातून उघड झालं आहे. त्यामुळे कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखणं ही सध्याची सर्वात महत्त्वाची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

भारतात 'या' प्रकारच्या कॅन्सर रुग्णांत वाढ

कॅन्सरला रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कॅन्सरवर करण्यात आलेल्या अभ्यासात भारतासह 200 देशांवर संशोधन करण्यात आलं आहे आणि त्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतात स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), अन्ननलिका कर्करोग (Esophageal Cancer) आणि Prostate Cancer चे रुग्ण सर्वाधिक असल्याचं संशोधनातून उघड झालं आहे.

कमी वयात कॅन्सर होण्यामागचं कारण काय?

'ब्रिटिश मेडिकल जर्नल'मध्ये (ऑन्कॉलॉजी) प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, खराब जीवनशैली, प्रदूषण आणि फारसं सक्रिय नसणं या कारणांमुळे कर्करोग होऊ शकतो. 'फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे मेडिकल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. अमित भार्गव सांगतात, खराब जीवनशैलीमुळे (Poor Lifestyle) कॅन्सरच्या रुग्णांत वाढ होते आणि कमी वयात कॅन्सर होण्याचं हे सर्वात मोठं कारण असू शकतं. धुम्रपान (Smoking), वेप ओढणे, अल्कोहोल पिणे (Alcohol Consumption), जंक खाणे (Junk Food) आणि अधिक केमिकलयुक्त अन्न खाल्ल्यामुळे कॅन्सरचे धोके वाढू शकतात.

फोन आणि जंक फूड देखील ठरु शकतं कारण

फोनचा अतिवापर (Excessive Use of Phone) आणि कमी अॅक्टिव्ह राहणं (Less Active) यामुळेही व्यक्तीमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीची विशेष काळजी घेतली पाहिजे. बाहेरील अन्न (Outside Food) आणि जंक फूडमुळे (Junk Food) आपल्याला आतड्याच्या विविध समस्या भेडसावतात. जंक फूडमुळे कॅन्सरचा धोका कसा उद्भवतो? हे संशोधनातून समोर आलं आहे.

प्रदूषण 'हे' देखील मोठं कारण

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यामागे प्रदूषण हे एक मोठं कारण असू शकतं. हवेवाटे सल्फर, कॅडमियम आणि कारखान्यातील प्रदूषण आपल्या शरीरात प्रवेश करते. कार्सिनोजेन्स (कर्करोगास कारणीभूत रसायन) देखील फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकतो. यासोबतच आपला चुकीचा आहार (Wrong Diet) आणि जीवनशैलीमुळे पोटात गॅस होण्याचं प्रमाण आणि आतड्याचा कर्करोग होण्याचं प्रमाण कसं वाढत आहे, हेही या संशोधनातून समोर आलं आहे.

खराब जीवनशैली ठरते घातक

दिल्लीतील एम्सचे प्रोफेसर आणि कॅन्सर सर्जन डॉ. एमडी रे यांच्या म्हणण्याप्रमाणे, खराब जीवनशैली आपल्याला महागात पडत आहे. खराब जीवनशैलीमुळे 30 टक्के तरुणांना कॅन्सर या आजाराने ग्रासलं असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. 45 वर्षांखालील लोक देखील खराब जीवनशैलीमुळे या आजाराला बळी पडत आहेत. या संशोधनातून स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं देखील स्पष्ट झाली आहेत.

काय आहे स्तनाच्या कर्करोगामागील कारणं?

स्तनाच्या कर्करोग (Breast Cancer) होण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, इस्ट्रोजेन हार्मोन्स आहे, जे शरीरातील टिश्यूज आणि डीएनए बदलतात. कर्करोगाच्या बाबतीत, कौटुंबिक इतिहास 5-10 टक्के भूमिका बजावतो. आजकाल 20 ते 22 वयोगटातील मुलींना देखील स्तनाच्या कर्करोगाने (Breast Cancer) ग्रासलं आहे, या प्रकरणात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केमिकलयुक्त अन्नामुळे कर्करोग होतो, असंही या अभ्यासातून समोर आलं आहे. केमिकलयुक्त अन्न खाल्ल्याने ते अवयव, रक्ताभिसरण, त्वचा आणि शरीरातील मऊ पेशींना त्रास देते आणि त्यामुळे त्यांचं कार्य बदलतं. आपल्या जीन्समध्ये बदल होत असतात, त्यामुळे देखील कर्करोग होऊ शकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Health Tips: ऑफिसच्या कामामुळे तणाव वाढलाय? तर बॉडी मसाज ठरेल उपयुक्त; जाणून घ्या, बॉडी मसाजचे फायदे आणि योग्य वेळ

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti : खातेवाटपानंतर पालकमंत्री पदाचा तिढा, पुण्यात चंद्रकांत पाटील की अजितदादा कोण पालकमंत्री?Miraj News : मिरजमध्ये 15 वर्षीय विश्वजित चंदनवालेनं गळफास घेऊन संपवलं जीवनRaksha Khadse : Girish Mahajan आणि  Eknath Khadse यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणारBharat Gogawale Mahad Jeep Rally : शिवसैनिकांकडून गोगावलेंची कोलाड ते महाड जीप रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget